छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणातून अटक केली. आरोपीला कोल्हापूरला आणण्याची तयारी सुरु झाली असून रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल होणार असल्याची माहिती आहे. आरोपीला कोल्हापुरात आणल्यानंतर उद्या कोर्टात हजर केले जाणार असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितले.
प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार होता. जामिनासाठी त्याने कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्याचा जमीन अर्ज फेटाळला.
यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध सुरु झाला. काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरचे काही फोटो देखील व्हायरल झाले होते. फोटोपाहून तो दुबईला फरार झाल्याचे बोलले जात होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका-प्रतिटीका झाली होती. आज अखेर त्याला तेलंगणातून अटक केली.
हे ही वाचा :
नागपूर: दोन रुपये चढ द्या, पण हिंदू माणसालाच बळ द्या!
कुणाल कामराच्या वादग्रस्त कार्यक्रमानंतर हॅबिटॅट स्टुडिओवर कारवाईचा बडगा
…म्हणे राणा सांगाने बाबरला भारतात आमंत्रित केले होते! काय आहे सत्य?
कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ११ जणांना अटक!
अटकेबाबत कोल्हापूर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून दुपारी २ च्या सुमारास ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यापासुन तो फरार होता. नागपूर, इंदौर, मुंबई, चंद्रपूर येथे त्याच्या शोधासाठी विविध पथके गठीत करण्यात आली होती.
आज त्याची सुनावणी होती, परंतु कोल्हापूर पोलसांनी त्याला ताब्यात घेतले. कोल्हापूर पोलिसांचे पथक आरोपीला घेवून कोल्हापूरला येत आहेत. कोल्हापूरला येण्यासाठी १२-१३ तास लागतात, रात्री उशिरा आरोपीला कोल्हापूरला आणल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून उद्या न्यायालयात हजर केले जाईल.