यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप २०१९च्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि सुमारे ३०० जागा मिळवेल, या त्यांच्या भाकितावर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर गुरुवारीही ठाम होते. त्यांच्या या दाव्यावर काही जणांनी टीका केली आहे. त्यांना प्रशांत किशोर यांनी सडेतोड उत्तर दिले. एका ट्विटमध्ये, किशोरने या टीकाकारांवर जोरदार टीका करून ४ जून जून रोजी, मतमोजणीच्या दिवशी भरपूर पाणी जवळ ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
प्रशांत किशोर यांनी नुकत्याच एका पत्रकाराला मुलाखत दिली. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर काही तासांनी प्रशांत किशोर यांनी ट्वीट केले. या मुलाखतीत, प्रशांत किशोर यांना सन २०२२मध्ये हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा पराभव होईल आणि भूतकाळातील त्यांचे दोन मतदान अंदाज चुकीचे ठरल्याची आठवण करून देण्यात आली.
प्रशांत किशोर यांनी हे भाकीत केल्याचे ठामपणे नाकारले आणि पत्रकाराला त्याचा पुरावा सादर करण्याचे आव्हान दिले.
मुलाखतीची क्लिप जसजशी सोशल मीडियावर फिरू लागली, तसतसे हिमाचल प्रदेशवरील त्याच्या जुन्या ट्वीट्सच्या स्क्रीनशॉट्सनी प्रशांत किशोर खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले. गुरुवारी प्रशांत किशोर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये, त्यांनी सन २०२१मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विजय मिळवेल, या त्यांनी केलेल्या भूतकाळातील भाकिताचाही उल्लेख केला.
हे ही वाचा:
‘जो काँग्रेसच्या पावलावर चालेल, तो रसातळाला जाईल’
‘अरविंद केजरीवाल हे ‘अनुभवी’ चोर’
‘मुलगा नाही, ड्रायव्हर गाडी चालवत होता’
केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती सेम टू सेम!
‘लक्षात ठेवा, २ मे २०२१ आणि पश्चिम बंगाल!!’ त्यांनी ट्वीट केले. किशोर यांनी २०२१च्या बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने २९४पैकी २१५ जागा जिंकून प्रचंड बहुमताने सत्ता कायम ठेवली.
‘पाणी पिणे चांगले आहे, कारण ते मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने ठेवते. या निवडणुकीच्या निकालाबाबत माझ्या अंदाजामुळे जे अस्वस्थ झाले आहेत, त्यांनी ४ जून रोजी भरपूर पाणी ठेवले पाहिजे. पुन्हा लक्षात ठेवा, २ मे २०२१ आणि पश्चिम बंगाल!!’ असे ट्वीट त्यांनी केले.
प्रशांत किशोर यांचा भाजपचा अंदाज
बुधवारी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी भाजपला स्वबळावर ३७० जागा मिळणे अशक्य असून पक्षाला जवळपास ३०० जागा मिळतील, असे भाकीत केले होते. भाजप ३७० जागा मिळवेल आणि एनडीए ४००चा टप्पा ओलांडेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या दिवसापासून केला होता, त्या दिवसापासून मी म्हणालो की हे शक्य नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी ही सगळी घोषणाबाजी आहे. भाजपला हे अशक्य आहे. परंतु हेदेखील निश्चित आहे की, पक्ष २७०च्या खाली जाणार नाही. मला विश्वास आहे की, भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ३०३ जागा मिळवल्या होत्या, तेवढ्या जागा यंदाही मिळेवल,’ असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते.