भारतीय नौदलाचे व्हाइस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ व्हाइस ऍडमिरल एस.एन. घोरमडे यांच्या हस्ते कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उद्योगपती प्रशांत कारुळकर यांना नुकतेच प्रशंसा पदक प्रदान करण्यात आले. भोपाळ येथे तिन्ही सेनादलांच्या कमांडर्सच्या संयुक्त परिषदेसाठी व्हाइल ऍडमिरल घोरमडे आलेले होते. त्याआधी त्यांच्या हस्ते हे पदक कारुळकर यांना प्रदान करण्यात आले. https://twitter.com/prash2011/status/1641650172617949184?s=20 सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल हे पदक प्रदान करण्यात आले. सेकंड इन कमांडचे अधिकारी घोरमडे यांच्याकडून हे पदक मिळाल्यामुळे आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना प्रशांत कारुळकर यांनी व्यक्त केली. एका सर्वसामान्य नागरिकाच्या कामाची अशा पद्धतीने दखल घेतल्यामुळे आपल्याला नवा हुरूप आल्याचेही कारुळकर म्हणाले. कारुळकर यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी आणि गेली ४० वर्षे देशसेवा करणाऱ्या व्हाइस ऍडमिरल घोरमडे यांच्याकडून हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे माझे डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.