29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषप्रशांत कारुळकर यांना नौदलाचे व्हाइस ऍडमिरल एस.एन. घोरमडे यांच्याकडून सन्मानचिन्ह

प्रशांत कारुळकर यांना नौदलाचे व्हाइस ऍडमिरल एस.एन. घोरमडे यांच्याकडून सन्मानचिन्ह

सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल पदक देऊन गौरवण्यात आले

Google News Follow

Related

भारतीय नौदलाचे व्हाइस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ व्हाइस ऍडमिरल एस.एन. घोरमडे यांच्या हस्ते कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उद्योगपती प्रशांत कारुळकर यांना नुकतेच प्रशंसा पदक प्रदान करण्यात आले. भोपाळ येथे तिन्ही सेनादलांच्या कमांडर्सच्या संयुक्त परिषदेसाठी व्हाइल ऍडमिरल घोरमडे आलेले होते. त्याआधी त्यांच्या हस्ते हे पदक कारुळकर यांना प्रदान करण्यात आले. https://twitter.com/prash2011/status/1641650172617949184?s=20 सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल हे पदक प्रदान करण्यात आले. सेकंड इन कमांडचे अधिकारी घोरमडे यांच्याकडून हे पदक मिळाल्यामुळे आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना प्रशांत कारुळकर यांनी व्यक्त केली. एका सर्वसामान्य नागरिकाच्या कामाची अशा पद्धतीने दखल घेतल्यामुळे आपल्याला नवा हुरूप आल्याचेही कारुळकर म्हणाले. कारुळकर यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी आणि गेली ४० वर्षे देशसेवा करणाऱ्या व्हाइस ऍडमिरल घोरमडे यांच्याकडून हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे माझे डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भोपाळ येथे तिन्ही संरक्षण दलांच्या कमांडर्स तसेच संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची ही परिषद आहे. १ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या परिषदेला विशेष उपस्थिती दर्शविणार आहेत. हे ही वाचा: पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात डासांच्या जळत्या कॉइलने घेतला सहा जणांचा घेतला जीव पंतप्रधान मोदींविरोधात पोस्टर, आठ जणांना अटक ब्रिटनच्या कोर्टातच खेचतो! ललित मोदींचा राहुल गांधींना इशारा कारुळकर प्रतिष्ठानचे समाजसेवा क्षेत्रातील अमूल्य योगदान कारुळकर प्रतिष्ठान हे गेली ५४ वर्षे समाजसेवेच्या क्षेत्रात काम करत आहे. पालघरमध्ये कोरोनाच्या काळात साधू हत्याकांडात प्राण गमावणारे वाहनचालक निलेश तेलगडे यांच्या परिवाराला कारुळकर प्रतिष्ठानने सहाय्य केले होते. कोविड काळात प्रतिष्ठानने पुढाकार घेत सर्व थरातल्या लोकांना मदत केली. अन्नपदार्थ, औषधे यांचे मोफत वाटप केले. या कार्याबद्दल त्यांना लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले तर साऊथ आशियाई चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडूनही कौतुक करण्यात आले. इंडो युके कल्चरल फोरमतर्फेही त्यांना गौरविण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा