‘नाट्यनिवडणुकीची दुसरी गोष्ट’चे दणदणीत यश, प्रशांत दामले विजयी

प्रशांत दामले प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत.

‘नाट्यनिवडणुकीची दुसरी गोष्ट’चे दणदणीत यश, प्रशांत दामले विजयी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली होती. त्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३- २०२८ ची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत अभिनेते प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

प्रशांत दामले हे प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. त्यांनी नवनाथ कांबळी यांचा पराभव केला आहे. उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली, तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी दोडके सतीश यांची निवड झाली आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार

नवीन पटनाईक यांच्या मनात चाललेय काय?

उमेदवार मृत्यूमुखी पडली, पण मतदारांनी निवडून आणले

बजरंग दलाला देशविरोधी म्हटल्या प्रकरणी मल्लिकार्जुन खर्गेंना नोटीस

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ गटाने दणदणीत विजय मिळवला होता. शिवाय कार्यकारी समिती सदस्यांमध्येही ‘रंगकर्मी नाटक समुहातील’ ११ जणांची निवड झाली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा समावेश आहे.

Exit mobile version