25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेष'ज्युनियर मुंबई श्री'चा मान मिळाला प्रणव खातूला

‘ज्युनियर मुंबई श्री’चा मान मिळाला प्रणव खातूला

दिव्यांगांच्या गटात नितेश भंडारी, महबूब शेख अव्वल

Google News Follow

Related

शरीरसौष्ठव चाहत्यांचे ज्या स्पर्धेकडे लक्ष असते अशा ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेत यंग दत्ताराम व्यायामशाळेचा प्रणव खातू विजेता ठरला. तसेच दिव्यांगांच्या मुंबई श्री स्पर्धेत नितेश भंडारी आणि महबूब शेख अव्वल आले. ज्युनियर मेन्स फिजीक प्रकारात प्रतिक साळवी आणि आनंद यादव यांनी बाजी मारली. मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेत सतीश पुजारी (७० किलो), जगदीश कावणकर (७० किलोवरील) आणि शशिकांत जगदाळे ( ५० वर्षावरील) यांनी सोनेरी यश संपादन केले.

कांदिवली पश्चिमेला बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना आयोजित शाम सत्संग भवनात तब्बल २५० पेक्षा अधिक पीळदार ग्लॅमरच्या उपस्थितीत रंगलेल्या संघर्षमय स्पर्धेत स्फूर्तीदायक खेळाचा मनमुराद आनंद क्रीडाप्रेमींना अनुभवता आला, दोन लाखांची बक्षीसे असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अत्यंत जोरदार चुरस पाहायला मिळाली. ज्युनियर मुंबई श्रीच नव्हे तर फिजीक प्रकारात खेळाडूंचा लाभलेला प्रतिसाद डोळे विस्फारणारा होता.

हे ही वाचा:

अखिलेश यादव यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या भुताने पछाडले!

हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगातला कैदी; भोगतोय ७८ वर्षांची शिक्षा

राहुल गांधींच्या न्याय यात्रेला सुरुवात होण्याआधीच मणिपूर सरकारचा मैदान देण्यास नकार!

मुइज्जू सरकारने लवकर भारताची माफी मागावी!

तसेच दिव्यांग मुंबई श्री आणि मास्टर्स मुंबई श्रीलाही मोठ्या संख्येने स्पर्धक उतरल्यामुळे सर्वच गटात शरीरसौष्ठवाचा थरार अनुभवायला मिळाला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, शिवसेना विभागप्रमुख अजित भंडारी, माजी नगरसेवक बाळा तावडे, दिलीप पटेल, युवा मोर्चाचे अमर शाह, संतोष राणे, शरीरसौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर,किट्टी फणसेका, राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

ज्युनियर मुंबई श्रीचा निकाल

५५ किलो वजनी गट : १. ऋषिराज दुबे (बोवलेकर जिम), २. दीपेश आरडे (बोवलेकर जिम), ३. दर्शन सावंत (द फ्लेक्स), ४. शुभम तांबे (धाको जिम), ५. सिद्धांत लाड (देवा फिटनेस). ६० किलो : १. प्रतीक साळवी (माँसाहेब जिम ), २. ओंकार भानसे (शिवाजी जिम), ३. सिद्धेश सुर्वे (परब फिटनेस), ४. वंश परमार (जय भवानी व्या. शाळा), ५. मोहम्मद समीर (आर्यन किंग फिटनेस). ६५ किलो : १. वेदांत शेलार (बाळ मित्र जिम), २. शिवा चौरिया (माँसाहेब जिम), ३. आदित्य पाटील (लोखंडे फिटनेस), ४. चंद्रमा गौड (पॉवर हाऊस), ५. मनीष भंडारी (शिवशक्ती जिम). ७० किलो : १. सूरज यादव (शिवाजी जिम), २. आनंद यादव (यूमिनिया जिम), ३. ओम वाडेकर (रिफ्युल जिम), ४. श्रीनाथ चव्हाण (ए फिटनेस), ५. अभिषेक रावल – (क्रांती जिम). ७५ किलो : १. अंबाजी बोडेकर (माँसाहेब जिम) , २. नवनाथ कामटे (सर्वेश्वर फिटनेस), ३. रेहान सय्यद (ओम साई फिटनेस), ४. वझीर शेख (रिफ्युल जिम)
५. विग्नेश जगदाळे (वीर हनुमान जिम). ७५ किलोवरील : १. प्रणव खातू (यंग दत्ताराम व्या. शाळा), २. ओंकार सुर्वे (अल्टिमेट जिम), ३. आयुष्य तांडेल (परब फिटनेस), ४. यश कारंडे (परब फिटनेस), ५. ओंकार गाडवे (वीर हनुमान व्या. शाळा)
किताब विजेता : प्रणव खातू (यंग दत्ताराम व्या. शाळा)

दिव्यांग मुंबई श्री स्पर्धेचा निकाल

५५ किलो : १. नितेश भंडारी (आर्यन जिम), २. सचिन गिरी (आगळे आगरी जिम), ३. मंदार मिर्लेकर (बाईंग जिम).
५५ किलोवरील : १. महबूब शेख (आयकॉन फिटनेस), २. सुरेश दासरी (परब फिटनेस), ३. अक्षय शेजवळ (समर्थ जिम).

ज्युनियर मेन्स फिजिक स्पर्धेचा निकाल
१६५ सेमीपर्यंत : १. प्रतिक साळवी (माँसाहेब जिम), २. स्वयम कदम (एस के फिटनेस), ३. ऐहफक बेग (जय भवानी जिम), ४. दर्शन सावंत (फ्लेक्स जिम), ५. राम यादव (व्ही फिटनेस).

१६५ सेमीवरील : १. आनंद यादव (युमोनिया जिम), २.रेहान सय्यद (ओम साई पॉवर जिम), ३. श्रीनाथ (ए फिटनेस), ४. वंश परमार (जय भवानी जिम), ५.भावेश ढगे (ओम साई पॉवर फिटनेस).

मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेचा निकाल :
४० ते ५० वर्षे – ७० किलो : १. सतीश पुजारी (नवभारत जिम), २. सखाराम शिंदे (ए फिटनेस) , ३. लीलाधर म्हात्रे (कृष्णा जिम), ४. हरिशकुमार दौंड (हर्क्युलस जिम), ५. शोएब खान (आर. एम. भट जिम).
४० ते ५० वर्षे – ७० किलोवरील : १. जगदीश कावणकर (मारुती जिम), २.सचिन तवटे (बॉडी फ्लेक्स), ३. रमेश बोटे (फिटनेस जिम)
५० ते ६०वर्षे : १. शशिकांत जगदाळे (वीर हनुमान), २. शिशिर राणा (फिटनेस झोन), ३. ओनील डिमेलो (माँसाहेब जिम).
६० वर्षावरील : १.रघुनंदन पाटील (बॉडी फ्लेक्स), २. विष्णू देशमुख – गजानन किणी जिम).

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा