प्रभू श्रीरामाचा द्वेष करणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये; प्रमोद कृष्णम यांचे खडे बोल!

काँग्रेसच्या हिंदुविरोधाचा चेहरा आणला समोर

प्रभू श्रीरामाचा द्वेष करणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये; प्रमोद कृष्णम यांचे खडे बोल!

आपल्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पक्षाच्या काही नेत्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये असे काही नेते आहेत जे प्रभू रामाचा द्वेष करतात.या नेत्यांना हिंदू शब्दाचा देखील तिरस्कार आहे.आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हणाले की, राजकारणात वापरली जाणारी भाषा असते ती एक सांकेतिक स्वरूपातील असते.माझी कोणाशी वैयक्तिक दुश्मनी नाही आहे.तसेच मी कोणाच्या विषयाबद्ल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित काहीच बोलणार नाही.परंतु मी जे अनुभवलंय ते असे की, काँग्रेस पक्षात असे काही नेते आहेत की ज्यांना राम मंदिराचा नाही तर भगवान रामाचा द्वेष आहे.हिदुत्व यावर नाही तर हिंदू या शब्दाचा त्यांना द्वेष आहे. अशा नेत्यांना हिंदू धर्मगुरूंचा अपमान करायचा आहे.पक्षात कोणताही हिंदू धर्मगुरू आहे हे त्यांना पटत नाही, असे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले.

हे ही वाचा: 

वरुणराजाची राजधानी दिल्लीवर कृपा! AQI पातळी ४०० वरून १०० वर

‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’

बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!

घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!

काँग्रेस पक्षाचं हिंदुविरोधी चरित्र त्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी आज उलगडून दाखवलं.
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी हिंदू विरोधी असलेली काँग्रेसची भूमिका उघड करून दाखवल्यानंतर भाजप महिला मोर्चा आघाडीच्या नेत्या चित्र वाघ यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे.चित्र वाघ ट्विट करत म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचं हिंदुविरोधी चरित्र त्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी आज उलगडून दाखवलं.

समस्त हिंदूंचं श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांचा द्वेष करणारे करंटे या पक्षात भरलेत, असं आचार्य सांगताहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना तर ‘हिंदू’ या शब्दाचीसुद्धा घृणा आहे. हिंदू धर्माचार्यांचा ते द्वेष करतात, असंही आचार्य प्रमोद म्हणताहेत.आम्हीही पहिल्यापासून काँग्रेसच्या याच हिंदूद्वेषी मानसिकतेवर टीका करत आलो आहोत. आता तर आचार्य प्रमोद यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेच काँग्रेसच्या हिंदूविरोधी मानसिकतेची लक्तरं भर वेशीवर टांगली आहेत.आखिर जो भगवान श्रीराम सब हिंदुओं के दिल में बसते हैं, वो काँग्रेस के मन में क्यों नहीं हैं…?

Exit mobile version