MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली

MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२० च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सांगलीच्या तरुणाने बाजी मारली आहे. सांगलीचा प्रमोद चौगुले या विद्यार्थ्याचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे. तर MPSC च्या मुख्य परीक्षेत मुलींमध्ये रुपाली माने या विद्यार्थीनीने पहिला क्रमांक पटकावला आहे. दरम्यान राज्य आयोगाने प्रथमच मुलाखती घेतल्यानंतर अवघ्या एक तासात निकाल जाहीर केला.

राज्यसेवा आयोगाने शुक्रवार, २९ एप्रिल रोजी एकूण ५९७ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या गुणवत्ता यादीत सांगलीच्या प्रमोद चौगुले याने सर्वाधिक ६१२.५० गुण मिळवून बाजी मारली आहे. तर ५९१.२५ गुण मिळवून नितेश नेताजी कदम हा राज्यात दुसरा आला आहे. त्यानंतर रुपाली माने या विद्यार्थीनीने ५८०.२५ गुणांसह राज्यात तिसरा आणि मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

प्रमोद चौगुले याने त्याच्या मिळवलेल्या यशानंतर विविध माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. प्रमोद चौगुले याने सांगितले की, २०१५ पासून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. अखेर मेहनत करून यावर्षी यश मिळालं आहे. गेल्या परीक्षेत त्याचा क्रमांक एका मार्काने हुकला होता. तसेच हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कोरोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हाच त्यांच्या घरचे सगळे कोरोना पॉझिटिव्ह होते. तेव्हा अभ्यास करून बिकट परिस्थितीतून मार्ग काढून हे यश मिळाल्याचे तो म्हणतो. घरच्यांनी या ओरवसात खूप पाठिंबा दिला, असेही प्रमोद चौगुले म्हणाला.

हे ही वाचा:

‘इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदेत मुंबई महापालिकेचा घोटाळा’

रशियाने दोन देशांची काढली ‘हवा’

पतियाळात ‘खलिस्तान मुर्दाबाद’चे नारे देणाऱ्या शिवसेना नेत्याचीच पक्षातून हकालपट्टी

खबरदार! वाकड्या नजरेने बघाल तर…

दरम्यान, कोरोना महामारी काळात आणि त्यानंतरही राज्यभरातील विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगावर टीका केली होती. आयोगाकडून वेळेत परीक्षा घेतल्या जात नाहीत, निकाल वेळेत जाहीर केले जात नाहीत, नियुक्त्या केल्या जात नाहीत, असे अनेक आरोप विद्यार्थ्यांनी केले होते.

Exit mobile version