अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयानावरून उडवली खिल्ली

ट्विट करत शेअर केलेल्या छायाचित्रामुळे झाला वाद

अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयानावरून उडवली खिल्ली

नरेंद्र मोदी सरकारला सातत्याने विरोध करणारे चित्रपट अभिनेते प्रकाश राज यांनी सोमवारी हद्दच केली. त्यांनी चांद्रयान ३ मोहिमेची खिल्ली उडवताना एक X वर मेसेज शेअर केला आहे. त्यातून नवा वाद निर्माण झाला.

 

 

चांद्रयान ३ ही मोहीम सध्या सुरू असून २३ ऑगस्टला हे यान चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे त्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. पण यानिमित्ताने प्रकाश राज यांनी एका चित्रासह शेअर करत नवा वाद निर्माण केला. या आपल्या संदेशामध्ये एक चित्र जोडले असून त्यात एक चहावाली व्यक्ती चहा ओतत असताना दाखवली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रावरून पहिले छायाचित्र समोर आले आहे. वॉव. विक्रमलँडर असे हॅशटॅग त्यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चायवाला म्हणत त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने होत असतो. तोच प्रयत्न प्रकाश राज यांनी केला आहे, पण त्यासाठी त्यांनी चांद्रयान मोहिमेचाच वापर केला आहे.

 

हे ही वाचा:

ऋतुराज बरसला, संजू, रिंकूही ठरले दमदार

देशभरातील जमीन व्यवहारांत मुंबई अव्वल

संजय राऊत म्हणतात पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो, तर निवडणूकही लढू

गंगोत्री महामार्गावर भाविकांची बस दरीत कोसळून अपघात, सहा भाविकांचा मृत्यू

प्रकाश राज यांनी केलेल्या या ट्विटवरून सोशल मीडियात त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. चांद्रयान ३ ही मोहीम भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे, खिल्ली उडविण्याची नाही, असे लोकांनी प्रकाश राज यांना सुनावले आहे.

 

 

चार्ली म्हणून एका व्यक्तीने म्हटले आहे की, चांद्रयान ३ ही मोहीम इस्रोची आहे, भाजपाची नाही. जर ही मोहीम यशस्वी ठरली तर ती भारतासाठी अभिमानाची गोष्ट असेल. तुम्हाला ही मोहीम अपयशी व्हावी असे का वाटते आहे? भाजपा हा एक पक्ष आहे जो आज सत्तेत आहे पण नंतर कदाचित नसेल. मात्र इस्रो ही संस्था कायम राहणार आहे. या संस्थेचा आम्हाला अभिमान असेल. काहीतरी करण्याच्या नादात तुम्ही राष्ट्रवादही विसरला आहात. भारताचे अपयश हा विजय होऊ शकत नाही. इस्रोला या राजकारणापासून लांब ठेवा.

 

 

पल्लवी सीटीने म्हटले आहे की, ही अशी चौथीच मोहीम असेल. शिवाय संपूर्ण भारतीय बनावटीची आहे. पण तुम्ही केवळ अंधभक्तीमुळे चांद्रयान ३ मोहिमेची खिल्ली उडवत आहात. नीतू खंडेलवालने म्हटले आहे की, तुम्ही एक भारतीय आहात. त्यामुळे तुम्हाला याचा अभिमान वाटला पाहिजे. भारतातील

Exit mobile version