‘जय भीम’ चित्रपटात प्रकाश राज यांनी मारलेल्या थपडेमुळे का रागावले लोक?

‘जय भीम’ चित्रपटात प्रकाश राज यांनी मारलेल्या थपडेमुळे का रागावले लोक?

‘जय भीम’ या चित्रपटावरून सध्या सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापले आहे. या चित्रपटातील एका प्रसंगाने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

प्रकाश राज हे यातील एका प्रमुख भूमिकेत असून ते एका प्रसंगात समोरच्या पात्राच्या श्रीमुखात भडकवतात. ती व्यक्ती हिंदीत बोलत असल्यामुळे प्रकाश राज त्याला थोबाडीत मारतात आणि तामिळमध्ये बोलण्यास सांगतात. त्यावरून सोशल मीडियात नाराजीचे वातावरण आहे.

हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाच वेगवेगळ्या भाषांत प्रदर्शित झाला. ऍमेझॉन प्राइमवर हा चित्रपट पाहता येणार आहे. पण या प्रसंगामुळे या चित्रपटाबद्दल नाराजी वाढली आहे.

प्रकाश राज यांच्याशी सुरू असलेल्या संवादात ती व्यक्ती हिंदीत बोलू लागते, तेव्हा प्रकाश राज त्याच्यावर रागावतात आणि त्याच्या श्रीमुखात भडकावतात. थोबाडीत मारल्यावर त्याला हिंदीत नाही तर तामिळमध्ये बोलण्यास भाग पाडतात. त्यावरून हिंदी भाषेला दुय्यम दर्जा का दिला जात आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. या प्रसंगाची चित्रपटात नेमकी आवश्यकता काय, असाही प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

 

हे ही वाचा:

काय आहे ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड’?

बामियान बुद्ध लेण्यांच्या जागी आता ‘शूटिंग रेंज’

अजित पवार लोकांना मूर्ख बनवणं बंद करा

मोदीजी, आपण लोकप्रिय आहात, आमच्या पक्षात या!

 

या चित्रपटातून हा प्रसंग काढून टाकावा अशी मागणीही आता पुढे येऊ लागली आहे. हा हिंदीविरोधी प्रचाराचा एक भाग आहे, असाही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सोशल मीडियावरील ट्रेंड ऍनालिस्ट रोहित जयस्वाल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘जय भीम’मधील हा प्रसंग बघितल्यावर दुःख झाले. हिंदीत न बोलता तामिळमध्ये बोलण्याची सक्ती प्रकाश राज यात करतात, या प्रसंगाची नेमकी आवश्यकता काय होती? हा प्रसंग त्यातून काढून टाकला जाईल, अशी अपेक्षा आहे.

 

Exit mobile version