लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीमध्ये पाच उमेदवारांचा समावेश असून राजस्थान मधील चार तर तामिळनाडू मधील एक उमेदवार आहे.
काँग्रेसच्या या यादीत राजस्थानच्या कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रल्हाद गुंजाळ यांनी नुकताच भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.आता यांचा सामना भाजप नेते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी होणार आहे. राजसमंदमधून सुदर्शन रावत आणि भिलवाडामधून दामोदर गुर्जर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तमिळनाडूतील तिरुनेलवेली येथून अधिवक्ता रॉबर्ट ब्रूस यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच अजमेरमधून रामचंद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसच्या सहाव्या यादीतून पाच उमेदवार जाहीर
केजरीवालनी खलिस्तानी चळवळीला मदत करण्याचे आश्वासन दिले होते!
प्रभू रामललाने भव्य महालात साजरी केली होळी!
मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मुईझ्झुंना सांगितले…दुराग्रह सोडा, शेजाऱ्यांशी जुळवून घ्या!
दरम्यान, काँग्रेसने डुंगरपूर-बंसवाडा वगळता सर्व जागांची घोषणा केली आहे.ही जागा आदिवासी पक्ष म्हणजेच बापसाठी सोडली जाऊ शकते, असे मानले जात आहे.राजस्थानमध्ये लोकसभेच्या २५ जागा आहेत.काँग्रेसने आतापर्यंत २१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.ज्यामध्ये एकूण 190 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
सहाव्या यादीत कोणाला कुठून मिळाली संधी?
राजस्थान, अजमेर- रामचंद्र चौधरी
राजस्थान, राजसमंद – सुदर्शन रावत
राजस्थान, भिलवाडा – डॉ.दामोदर गुर्जर
राजस्थान, कोटा – प्रल्हाद गुंजाळ
तामिळनाडू, तिरुनेलवेली – रॉबर्ट ब्रुस