भारताचा युवा बुद्धिबळपटू आर प्रज्ञानंदाने पुन्हा एकदा मॅगनस कार्लसन याचा पराभव केला आहे. मियामी येथे सुरू असलेल्या FTX क्रिप्टो कपमध्ये पाच वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा पराभव केला. मागील सहा महिन्यांत प्रज्ञानंदाने तिसऱ्यांदा विश्वविजेत्या कार्लसनचा पराभव केला आहे.
प्रज्ञानंदाने कार्लसनकडून सलग तीन गेम जिंकले, त्यात टायब्रेकमधील दोन गेमचा समावेश होता. कार्लसन आणि प्रज्ञानंदा यांच्यातील पहिले दोन सामने अनिर्णित राहिले. कार्लसनने तिसरा गेम जिंकला पण त्यानंतर प्रागननंदाने हार न मानता चौथा गेम जिंकून सामना टायब्रेकरवर आणला. यानंतर टायब्रेकरमध्ये दोन्ही गेम प्रज्ञानंदाने जिंकले.
Rameshbabu Praggnanandhaa defeats the reigning 5-time World Chess Champion, Magnus Carlsen at the FTX Crypto Cup.
(file pic) pic.twitter.com/KTFFJ0FiLv
— ANI (@ANI) August 22, 2022
हे ही वाचा:
‘मेटेंची गाडी ओव्हरेटक करताना ड्रायव्हरचं जजमेंट चुकलं आणि अपघात झाला’
संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना होणार अटक?
कार्लसनवर विजय मिळवूनही प्रज्ञानंदाने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आहे. कार्लसनने सर्वाधिक गुण मिळवत विजेतेपद पटकावले असून त्याने एकूण १६ गुण मिळवले तर प्रज्ञानंदाने १५ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.