प्रज्ञानंद- कार्लसन पहिला डाव बरोबरीत

बुद्धिबळ विश्वचषक २०२३ अंतिम सामना

प्रज्ञानंद- कार्लसन पहिला डाव बरोबरीत

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने मंगळवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या आणि पाचवेळा जगज्जेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांसह बरोबरी साधली. पहिल्या गेममध्ये ३५ चालींनंतर दोन्ही डाव बरोबरीत सुटले. मंगळवारी पहिल्या गेममध्ये प्रज्ञानंद पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळला होता आणि बुधवारी, दुसऱ्या गेममध्ये मॅग्नस कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांसोबत खेळेल. त्यामुळे त्याचे पारडे जड राहील, असे जाणकारांना वाटते.

बुद्धिबळ विश्वचषक अंतिम फेरीत दोन गेम असतील. दोन्ही खेळाडूंना पहिल्या ४० चालींसाठी ९० मिनिटे मिळतील. प्रत्येक चालीसाठी ३० सेकंदांच्या अधिक वेळेसह उर्वरित गेमसाठी ३० मिनिटे दिली जातील. दोन्ही गेममध्ये एकही विजेता ठरला नाही, तर दोन्ही खेळाडू वेगवान फॉरमॅटमध्ये दोन गेम खेळतील, ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला १० मिनिटांचा वेळ असेल आणि प्रत्येक चालीसाठी १० सेकंद अधिक वेळ मिळेल. तरीही विजेता न ठरल्यास पाच मिनिटांच्या मर्यादित वेळेसह आणि प्रत्येक चालीसाठी तीन सेकंदाच्या वाढीव वेळेचे आणखी दोन ‘वेगवान’ खेळ खेळले जातील. तरीही गुण समसमान राहिल्यास अंतिम सामना एका ब्लिट्झ गेममध्ये सडन-डेथ मोडमध्ये खेळला जाईल.

हे ही वाचा:

झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण बंद

विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

चांद्रयानाच्या लँडिंगचा ऐतिहासिक क्षण घरबसल्या अनुभवता येणार

प्रज्ञानंद हा दिग्गज बॉबी फिशर आणि कार्लसन यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तिसरा सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे. ‘मी या स्पर्धेत मॅग्नसविरुद्ध खेळेन, अशी मला अजिबातच अपेक्षा नव्हती. कारण त्याच्याविरुद्ध खेळण्याचा एकमेव मार्ग होता, तो म्हणजे अंतिम सामन्यात खेळणे. आणि मला स्वत:लाच मी अंतिम सामन्यात खेळेन, अशी अपेक्षा नव्हती. मी केवळ माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन,’ अशी प्रतिक्रिया प्रज्ञानंदने सोमवारी दिली.

Exit mobile version