रोव्हर प्रज्ञानने घेतली चंद्राची रंगीबेरंगी छायाचित्रे

ही छायाचित्रे लाल आणि निळसर चष्म्यांसह पाहावी, अशी सूचना इस्रोने केली

रोव्हर प्रज्ञानने घेतली चंद्राची रंगीबेरंगी छायाचित्रे

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अलीकडेच ऍनाग्लिफ तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तू आणि चंद्राच्या भूभागाचे तीन आयामांमध्ये (थ्रीडी) व्हिज्युअलायझेशन करण्याची एक नवीन पद्धत उघड केली आहे. या अभिनव तंत्राचा उपयोग थ्रीडी प्रभाव तयार करण्यासाठी होतो. स्टिरिओ किंवा मल्टी-व्ह्यू इमेजेस वापरल्यामुळे त्यातून अधिक तपशीलवार दृश्य दिसते. इस्त्रो येथील इलेक्ट्रो-ऑप्टिक सिस्टीम्स (एलईओएस) प्रयोगशाळेने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यात नॅवकॅम स्टीरीओ इमेजेस वापरून ऍनाग्लिफ प्रतिमा तयार केल्या आहेत. या प्रक्रियेमध्ये प्रज्ञान रोव्हर डाव्या आणि उजव्या दोन्ही प्रतिमा कैद करू शकते. या प्रतिमांवर नंतर वेगवेगळ्या रंगांत थ्रीडीचे संस्करण केले जाते.

या विशिष्ट ३-चॅनेल प्रतिमेमध्ये, डावी प्रतिमा लाल चॅनेलमध्ये ठेवली जाते, तर उजवी प्रतिमा निळ्या आणि हिरव्या चॅनेलमध्ये ठेवली जाते, त्यामुळे एक निळसर रंगाची छटा तयार होते. या दोन प्रतिमांमधील फरकामुळे ‘स्टिरिओ इफेक्ट’ होतो. त्यामुळे थ्रीडी दृश्य दिसते. या प्रतिमा तपशीलवार जाणून घेण्यासाठी, ही छायाचित्रे लाल आणि निळसर चष्म्यांसह पाहावी, अशी सूचना इस्रोने केली आहे.

हे ही वाचा:

सनातन धर्माबद्दल टिप्पणी प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा

विशेष अधिवेशनाचे काम दुसऱ्या दिवसापासून नव्या इमारतीत

इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना पूर्णविराम; संजय राऊतांनी सांगितले कारण

सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा

लाल आणि निळसर चष्म्यातून पाहिल्यास प्रत्येक डोळ्यातून एक रंग फिल्टर होतो आणि मेंदूला दोन प्रतिमांवर एकत्रितपणे प्रक्रिया करण्यास आणि थ्रीडीमध्ये प्रतिमा जाणण्यास सक्षम केले जाते. या प्रतिमांसाठी डेटा प्रक्रिया इस्रो येथील स्पेस !ऍप्लिकेशन सेंटर (एसएसी) द्वारे केली जाते. इमेजिंग तंत्रज्ञानातील या प्रगतीमुळे अंतराळ संशोधनासाठी नवीन संधीची दारे खुली होणार आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांना खगोलीय पिंडांचा पूर्वीपेक्षा अधिक तपशीलवार अभ्यास करता येईल. या विकासामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे अंतराळ तंत्रज्ञान आणि संशोधनात इस्रोचे स्थान आणखी बळकट झाले आहे.

Exit mobile version