मुलांनी टीव्ही पाहू नये यासाठी त्याच्या आईवडिलांनी त्याला आणि त्याच्या बहिणीला बुद्धिबळाकडे आकर्षित केले आणि आज तोच मुलगा जागतिक स्तरावर बुद्धिबळात भारताचे प्रतिनिधित्व करतो आहे, एवढेच नव्हे तर तो जागतिक उपविजेताही ठरला आहे. ही गोष्ट आहे बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याची. विशेषतः त्याची आई नागलक्ष्मी या प्रज्ञानंदच्या या वाटचालीत पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळेच त्याला हे यश मिळाले आहे.
प्रज्ञानंद आणि त्याची बहीण तसेच बुद्धिबळातली ग्रँडमास्टर वैशाली यांना त्यांच्या आईवडिलांनी टीव्हीचा नाद लागू नये म्हणून विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना बुद्धिबळाच्या वर्गात घातले. या दोघांचीही पालकांनी खूप काळजी घेतली. त्यामुळेच त्यांनी टीव्हीपासून दूर नेण्यासाठी त्यांना बुद्धिबळाची गोडी लावली आणि हळूहळू तेही बुद्धिबळात रममाण झाले.
हे ही वाचा:
सीबीआय चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या
मुख्यमंत्र्यांना अयोध्येतील श्रीराममंदिराची क्रिस्टल प्रतिकृती भेट
‘आयएनएस सुनयना’ची दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन बंदराला भेट
जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता
नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपसाठीही त्या प्रज्ञानंदसोबतच होत्या. त्यावेळीही त्याला आधार मिळावा यासाठी त्या त्याच्यासोबतच होत्या. नेहमीच त्या विविध स्पर्धांसाठी प्रज्ञानंदसोबत असतात. त्याचे वडील रमेशबाबू म्हणतात की, ती प्रज्ञानंदची पूर्ण काळजी घेते. एवढेच नव्हे तर परदेश दौऱ्यावर असताना त्या सोबत प्रेशर कूकर, मसाले असे सगळे साहित्यही नेतात. तिथे त्याला त्याच्या आवडीचे रस्सम करून खायला घालतात. त्याला कुठेही कमतरता भासू नये याची त्या काळजी घेतात. घरचे जेवण मिळावे हा त्यांचा यामागे हेतू असतो.