दूरदर्शनचा आवाज काळाच्या पडद्याआड; प्रदीप भिडे यांचे निधन

दूरदर्शनचा आवाज काळाच्या पडद्याआड; प्रदीप भिडे यांचे निधन

डीडी सह्याद्रीवरील सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे. प्रदीप भिडे यांचे मुंबईत निधन झाले असून गेले काही वर्षांपासून ते आजारी होते. वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीप भिडे यांनी अखेरचा श्वास घेतला. भिडे यांच्या निधनाची माहिती डीडी सह्याद्रीकडून ट्विटरवर देण्यात आली आहे.

दुरदर्शनचा आवाज आणि चेहरा अशी प्रदीप भिडे यांची ओळख होती. या वृत्तानंतर माध्यम क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रदीप यांच्या खास आवाजामुळे भिडे हे दुरदर्शनची ओळख बनले होते. तसेच त्यांच्या भारदस्त आवाजामुळे ते महाराष्ट्रातील घराघरात पोहचले होते.

प्रदीप भिडे यांनी पत्रकाराची पदवी घेतल्यानंतर ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम केले.

हे ही वाचा:

काश्मीरमध्ये वासुकी नाग मंदिराची तोडफोड

अनिल देशमुखांविरोधात सचिन वाझे आता अधिकृतरित्या माफीचा साक्षीदार

आता रेल्वेत महिन्याला होणार २४ तिकिटांचे बुकिंग

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन केंद्राचीच!

१९७४ पासून त्यांनी मुंबई येथे वृत्तविभागामध्ये अनुवादक म्हणून काम करायला सुरुवात केली. वयाच्या २१ व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली. मराठी वाङमय, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका या विषयांमध्ये त्यांना विशेष आवड होती. प्रसारमाध्यमातच करिअर करावं असा त्यांचा मानस होता आणि त्यांनी तब्बल २५ वर्षे वृत्तनिवेदन केलं.

Exit mobile version