30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषनेपाळमध्ये 'प्रचंड' पराभव!

नेपाळमध्ये ‘प्रचंड’ पराभव!

विश्वासदर्शक ठराव गमावल्याने दहल यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा

Google News Follow

Related

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांना मोठा धक्का बसला आहे. प्रचंड यांच्या सरकारने संसदेतील विश्वासदर्शक ठराव गमावला आहे. त्यामुळे १९ महिने सत्तेत राहिल्यानंतर त्यांना आता पायउतार व्हावे लागले आहे. माजी पंतप्रधान केपी शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलने सरकारने पाठिंबा काढून घेतल्यानंतर प्रचंड यांना विश्वासदर्शक ठराव घ्यावा लागला. शुक्रवारी संसदेत विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला, त्यात त्यांचा पराभव झाला आहे.

संसदेत पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांना अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची ही पाचवी वेळ होती. यापूर्वी चार वेळा विश्वासदर्शक ठराव मिळवण्यात त्यांना यश आले होते. मात्र, पाचव्यांदा त्यांना पाठिंबा न मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वास्तविक, दहल सरकारचा सर्वात मोठा सहयोगी असलेल्या सीपीएन-यूएमएलने काही दिवसांपूर्वी (३ जुलै) प्रचंड सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. २५ डिसेंबर २०२२ रोजी दहल यांची पंतप्रधान निवड करण्यात आली होती. मात्र, सतत त्यांचे सरकार अल्पमतात होते. अखेर १९ महिन्यांनी त्यांचे सरकार पडले आहे. प्रचंड यांना २७५ सदस्यांच्या सभागृहात फक्त ६३ मते मिळाली आहे. तर प्रस्तावाच्या विरोधात १९४ मते पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी किमान १३८ मतांची आवश्यकता होती.

हे ही वाचा:

माजी मुख्यमंत्री रेड्डी यांच्यासह दोन आयपीएस अधिकाऱ्यांवर गुन्हा

२५ जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित!

कर्नाटक सरकारकडे विकासकामांसाठी पैसा नाही

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी फाईलमध्ये पैसे का ठेवले…

नेपाळ काँग्रेससोबत सत्तेत असलेले केपी शर्मा ओली यांनी पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आले होते. प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ यांच्याकडे (माओवादी केंद्र) केवळ ३२ जागा, तर सीपीएन-यूएमएलकडे ७८ आणि नेपाळी काँग्रेसकडे ८९ जागा आहेत. नेका आणि सीपीएन-यूएमएल आघाडीकडे आता १६७ जागांचे संख्याबळ आहे.

नेपाळच्या २७५ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात सरकार स्थापन करण्यासाठी १३८ सदस्यांची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे नेका आणि सीपीएन-यूएमएल यांची युती झालीतर त्यांची एकत्रित संख्या १६७ होते. ही संख्या बहुमताच्या संख्येपेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे देउबा आणि ओली पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेका आणि सीपीएन-यूएमएल यांच्या झालेल्या करारानुसार ओली हे दीड वर्षासाठी तर देउबा हे उर्वरित कार्यकाळासाठी पंतप्रधानपद भूषवतील. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांनी पंतप्रधान म्हणून ओली यांना पाठिंबा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा