सचिन, धोनीनंतर पीआर श्रीजेशच्या जर्सीला मिळाला मान, १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त !

पीआर श्रीजेशच्या सन्मानार्थ हॉकी इंडियाने घेतला निर्णय

सचिन, धोनीनंतर पीआर श्रीजेशच्या जर्सीला मिळाला मान, १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त !

पॅरिस ऑलम्पिक २०२४ च्या स्पर्धेत हॉकी संघाने उतृष्ट अशी कामगिरीत करत कांस्य पदकावर नाव कोरले. भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकताच देशभरात एकच जल्लोष साजरा करण्यात आला. एकीकडे आनंद साजरा होत असताना दुसरीकडे गोलरक्षक पीआर श्रीजेश यांच्या निवृत्तीने दुःखही वाटत होते. स्पर्धेपूर्वीच श्रीजेश याने निवृत्तीची घोषणा केली होती. अखेर स्पर्धेत कांस्य पदक मिळवताच त्याच्या हॉकी कारकिर्दिचा शेवटही गोड झाला. याचदरम्यान श्रीजेशच्या सन्मानार्थ हॉकी इंडियाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाने बुधवारी (१४ ऑगस्ट) महान गोलरक्षक पीआर श्रीजेशची १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी ही घोषणा केली. ‘श्रीजेश आता ज्युनिअर भारतीय हॉकी संघाचा कोच झाला आहे. तसेच आम्ही सिनिअर हॉकी टीममधून त्याची जर्सी नंबर १६ रिटायर केली आहे. आम्ही ज्युनिअर हॉकी संघातून जर्सी नंबर १६ रिटायर करत नाही, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे , हॉकी इंडियाने पीआर श्रीजेशचा सन्मान केला. तसेच श्रीजेशला २५ लाखांचा धनादेश दिला आहे.

हे ही वाचा:

अतीक अहमदच्या मुलाचा एनकाउंटर करणाऱ्या एसटीएफ टीमला ‘राष्ट्रपती शौर्य पदक’

एस.टी.महामंडळ नफ्याच्या उंबरठ्यावर !

बांगलादेशमध्ये हिंदुंवरील अत्याचाराबद्द्ल रिपब्लिकन नेत्याने केला निषेध

तुरुंगवास भोगलेल्या माजी वकिलाची मंत्रिमंडळात नियुक्ती; थायलंडच्या पंतप्रधानांची हकालपट्टी

दरम्यान, बीसीसीआयने २०१७ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची जर्सी नंबर १० रिटायर करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर २०२३ मध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी नंबर ७ रिटायर केली होती. सचिन, धोनीनंतर पीआर श्रीजेशला हा मान मिळाला. त्यामुळे हॉकीच्या सामन्यात आता १६ नंबरची जर्सी पुन्हा दिसणार नाही.

Exit mobile version