पोयसर नदी रुंदीकरणाच्या कामात बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांना याच परिसरात घरे उपलब्ध करून आज या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आणि त्यानंतरच नदीच्या रुंदीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नातून बाधित झोपडपट्टीधारकांना आज महापालिका आर. दक्षिण विभाग कार्यालयात घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले. तसेच हनुमाननगर येथे नदी रुंदीकरण कामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला.
हेही वाचा..
रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला मिनिबस धडकली, आठ ठार!
अजित पवारांनी पुन्हा केली शरद पवारांची पोलखोल
बेंगळुरूमधील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!
बेंगळुरूमधील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!
महापालिका विभाग कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आज २१ बाधित झोपडपट्टी धारकांना आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते चावीचे वाटप करण्यात आले. तसेच या पूर्वी ३५ बाधिताना घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, विकास हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून करावा लागतो. लोकांच्या घरांवर बुलडोजर फिरवून विकास काही उपयोगाचा नाही. याच भूमिकेतून पोयसर नदी रुंदीकरणात बाधित झालेल्या झोपडपट्टी धारकांना याच परिसरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. आज बाधित नागरिकांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द करताना आनंद होत आहे. आमचा विकासाला विरोध नाही उलट विकास हाच भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे, असेही आमदार भातखळकर म्हणाले.
पोयसर नदी रुंदीकरण आणि खोलीकरण कामात परिसरातील बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांना याच परिसरात घरे मिळाली पाहिजेत यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. या कामासाठी खूप संघर्ष केला होता. अखेर या प्रयत्नाना यश आले. यावेळी उपस्थित बाधित झोपडपट्टी धारकांनी चावी मिळाल्यानंतर समाधान व्यक्त करून आमदार अतुल भातखळकर यांचे आभार मानले.