27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषव्यायामातून सुदृढ समाज निर्माण करणारा सच्चा खेळाडू म्हणजे मधुकर दरेकर

व्यायामातून सुदृढ समाज निर्माण करणारा सच्चा खेळाडू म्हणजे मधुकर दरेकर

दरेकर यांचे हृदयविकाराने निधन

Google News Follow

Related

बलदंड शरीर, पण तेवढाच मृदू स्वभाव यासाठी क्रीडाक्षेत्रात परिचित असलेले मधुकर दरेकर यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

व्यायाममहर्षी, पॉवरलिफ्टिंगमधील भीष्म पितामह अशा बिरुदांनी मधुकर दरेकर यांना क्रीडाक्षेत्रातील लोक ओळखत होते. खेळाडू, संघटक, पंच, प्रशिक्षक, प्रशासक व मार्गदर्शक अशा विविध भूमिका दरेकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत यशस्वीरित्या निभावल्या. व्यायामपटूंना, शरीरसौष्ठवपटूंना निरपेक्षपणे त्यांनी मार्गदर्शन केले, त्यांना घडविले. आता आतापर्यंत त्यांनी आपले हे कार्य सुरूच ठेवले होते. ५८ वर्षे त्यांनी या क्षेत्राला वाहिली.

वयाच्या १२व्या वर्षी कोकणातील कशेडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथून मधुकर दरेकर मुंबईत आले. परळच्या सोशल सर्व्हिस लीगमध्ये त्यांनी व्यायामाचे धडे गिरविले. पिळदार शरीरयष्टी असलेले मधुकर दरेकर यांनी ३४ वर्षे ग्लॅक्सो लॅबोरेटरीज मध्ये नोकरी केली. कामगार क्रीडा भवन, चेंबूरचे पवनपुत्र व्यायाम मंदिर, वांद्रे फिजिकल असोसिएशन, करमरकर हेल्थ स्पा येथे त्यांनी अनेक युवकांना दिशा दिली.

स्वतः वेटलिफ्टर आणि पॉवरलिफ्टर म्हणून त्यांनी ख्याती मिळविली. १९६४मध्ये त्यांनी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंगचे सुवर्णपदक जिंकले. १९६४ ते १९८६ या कालावधीत त्यांनी तब्बल ९ सुवर्णपदके जिंकली. प्रशासक म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्षपद २१ वर्षे भूषविले.

हे ही वाचा:

भारत आदर्श समाज म्हणून उदयास यावा यासाठी आरएसएसचे काम

फडणवीसांची वॉशिंग मशीन आणि फोन टॅपिंगचा जांगडगुत्ता…

बनावट पासपोर्ट, व्हीसाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

गणेश मंडपात खड्डा असेल तर दोन हजारांचा दंड

 

१९८३मध्ये महिलांसाठी पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंगच्या प्रशिक्षणाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यातूनच अनेक महिला खेळाडू या खेळात महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव करताना दिसत आहेत. अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी पॉवरलिफ्टर, वेटलिफ्टर तयार करत राहीन, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतरही मधुकर दरेकर हे अजूनही सकाळी काही तास व्यायाम व योगासने करत असत. त्यांच्या निधनामुळे क्रीडाक्षेत्राला निरपेक्ष मनाने योगदान देणारा कार्यकर्ता, खेळाडू, मार्गदर्शक हरपल्याची भावना क्रीडापटू, पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा