दोन वर्षांपासून डोंबिवलीकरांच्या प्रतीक्षेत असलेला कोपर उड्डाणपूल नागरिकांसाठी सुरू झाला. कोपर उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन दोन दिवस उलटतात तोच या पुलावर खड्डे पडू लागले आहेत.
पुलाच्या मध्यवर्ती भागात मोठा खड्डा पडला असून अन्य काही ठिकाणीही डांबर उखडून खड्डे पडू लागले आहेत. दोनच दिवसांत पुलाची अशी अवस्था झाल्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डोंबिवली पूर्व- पश्चिम असा प्रवास करण्यासाठी कोपर उड्डाणपुलाचा मार्ग हा कमी अंतराचा आहे. त्यामुळे प्रवासी ठाकुर्ली येथील पुलाच्या ऐवजी या पुलाचा वापर जास्त करतात. पुलाच्या दुरुस्ती कामासाठी हा पूल काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पूल वाहतुकीसाठी खुला केल्याचे समजताच प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र, दोनच दिवसांत पुलाची अशी अवस्था झाल्याने या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
हे ही वाचा:
भारत-इंग्लंड शेवटचा कसोटी सामना आजपासून
तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा
चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कोपर पूल सुरू झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणपती घेऊन जाणारी वाहने, अवजड माल वाहून नेणारी वाहने या पुलावरून ये- जा करू लागली आहेत. अशात पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या वाहनांना अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुलाचे डांबरीकरणाचे काम, नव्याने खड्डे पडणे अशा समस्या सुरू झाल्याने सर्व कामची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. काही जागरूक नागरिकांनी खड्ड्यांचे फोटो काढून पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना ते पाठवून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याच्या सूचना केल्या आहेत.