27 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरविशेष‘83’  चित्रपटाच्या नवीन पोस्टरची चर्चा

‘83’  चित्रपटाच्या नवीन पोस्टरची चर्चा

Google News Follow

Related

अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधित सर्व माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो. रणवीरने इंस्टाग्रामवर ’83’  चित्रपटाचे नवीन पोस्टर आजच शेअर केले आहे. हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

त्या पोस्टरमध्ये संपूर्ण टीम रणवीरच्या मागे धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर तिरंग्यामध्ये पाहायला मिळत आहे. पोस्टर शेअर केल्यानंतर त्याला पाच तासातच ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या चित्रपटात त्याची पत्नी दीपिका पदुकोणही आहे. आणि चित्रपटात ती रणवीरची पत्नी याच भूमिकेत दिसणार आहे. रणवीर सिंगने या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट लोकांमध्ये उत्सुकतेचा विषय बनला आहे. चित्रपट चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी लॉर्ड्स,  लंडन येथे क्रिकेट विश्वचषक जिंकला. त्या विजयाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत म्हणजेच कपिल देव च्या भूमिकेत दिसणार आहे. डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे तर, २४ डिसेंबरला चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

हे ही वाचा:

त्रिपुरात भाजपाचे त्रिशतक! स्ट्राईक रेट ९८.५%

गोव्याला नमवून महाराष्ट्राच्या किशोर खोखो संघाची विजयी सलामी

तीन पक्षांचा तमाशा!

विकासकामांना पाठिंबा दिल्याबद्दल सरपंचाच्या पतीची केली माओवाद्यांनी हत्या

 

हा चित्रपट हिंदी,  तमिळ,  तेलुगु,  मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. कलाकारांमध्ये रणवीर सिंग,  एमी विर्क, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे,  साकिब सलीम,  ताहिर भसीन,  जतिन सरना, जीवा आणि पंकज त्रिपाठी यांचा समावेश आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमीच्या भूमिकेत दिसणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा