कुरिअर कंपन्यांच्या वाढत्या स्पर्धेत ग्राहकांचा विश्वास अन याच बळावर टपाल व्यवस्थेची सेवा वृद्धिंगत करण्यात भारतीय टपाल विभाग नेहमीच अग्रेसर ठरत आहे. यावर्षी मुंबई टपाल विभागाने रक्षाबंधनासाठी खास आकर्षित लिफाफ्यांची सुमारे २० हजार ७०० इतकी विक्री केल्याची नोंद आहे. यामध्ये लिफाफे साधे पाकिट, स्पीड पोस्ट आणि रजिस्टरद्वारे वितरित केल्या जातात. टपाल विभागात ज्या दिवशी राख्या येतात त्याच दिवशी पोस्टमनद्वारे इच्छितस्थळी पोहोचवले जाते. अशी खास व्यवस्था राख्यांसाठी केलेली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात एकूण टपाल विभागांची २३० कार्यालये असून, टपाल विभाग राखी कव्हर (लिफाफा) बनवून त्याची विक्री करतात. विशेष फक्त १० रुपयांच्या वाजवी किमतीमध्ये ही पाकीट उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे स्पीड पोस्ट व रजिस्टरद्वारे कोणतीही भेट वस्तू पाठवायची असेल तर त्यांची वजनावर आकारणी केली जाते. याच आकारणीद्वारे राख्या वितरण केल्या जात आहेत.
पूर्वीच्या काळात रक्षाबंधन झाल्यावर राखी इच्छितस्थळी पोहोचल्या जात होत्या. मात्र आता आधुनिक काळात दळणवळणाची योग्य सोय झाल्यामुळे वेळेवर ग्राहकांचे भेटवस्तू पोस्टमन मार्फत पोहोचवल्या जात आहेत. तसेच राखी वेळेत व लवकर वितरित व्हावी यासाठी टपाल विभागाचे अधिकरी, कर्मचारी काम करीत आहेत. अशी माहिती मुंबई टपाल विभागांच्या जनरल पोस्टमास्तर स्वाती पांडे यांनी दिली.
हे ही वाचा:
आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?
दहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक
मंत्रिमंडळाच्या विस्तारात मिठाचा खडा
पाकिस्तान, श्रीलंकेच्या वाटेवर बांगालादेश
कोरोना काळात राख्यांसाठी टपाल विभागांची मोठी मदत
कोरोना काळात अत्यावश्यक सेवा सोडली असता, इतर सर्व सेवा बंद होते. लॉकडाऊन काळात रक्षाबंधनासाठी टपाल विभागाने मोठ्या प्रमाणात सेवा बजावली होती. बहुतांश नागरिकांनी टपालामार्फत राख्या पाठवल्या होत्या. गतवर्षी मुंबई तसेच इतर जिल्ह्यातून साधे पाकिटे, स्पीड पोस्ट, रजिस्टरद्वारे आलेल्या राख्यांची संख्या सुमारे २ लाख ६५ हजार इतकी होती. तसेच मुंबईहून परजिल्ह्यात १ लाख २४ हजार राख्या वितरित करण्यात आल्या होत्या.