प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती आता समोर आली आहे. कौशिक यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. पण आदल्या दिवशी होळीत सहभागी झालेले कौशिक यांचा अचानक कसा मृत्यू झाला याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यानंतर त्यांच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून नवी माहिती समोर आली आहे.
दिल्लीत आपल्या मित्रमंडळींसमवेत होळीचा आनंद घेतल्यानंतर त्यांनी आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. पण अशा आनंदी वातावरणात असलेले कौशिक अचानक मृत्युमुखी पडतील, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर चित्रपटक्षेत्राला मोठा धक्का बसला.
हे ही वाचा:
शिंदे फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांना गिफ्ट; आता मिळणार प्रतिवर्षी १२ हजार रु.
महाराष्ट्राचे वाळवंट होऊ नये म्हणून नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेतीचा पुरस्कार
संजय राऊत भ्रमिष्ट झालेत, त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे न्या!
‘पाकिस्तानने चिथावणी दिली तर त्यांचे काही खरे नाही…भारत देणार चोख उत्तर
त्यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. त्यांच्या शरीरात मद्याचा अंश नाही. किंवा त्यांच्या या मृत्यूला एखादा कटकारस्थानही जबाबदार नाही, असेही स्पष्ट होत आहे. त्यांचे रक्त आणि व्हिसेराही पुढील तपासासाठी पाठविण्यात आला आहे. मात्र प्रारंभिक शवविच्छेदन अहवालानुसार कोणताही संशयास्पद प्रकार घडलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे.
कौशिक यांचे व्यवस्थापक म्हणाले की, रात्री १०.३० ला सतीश कौशिक हे विश्रांती करण्यासाठी गेले पण १२.३० वाजता त्यांचा फोन आला. त्यावेळी आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
आता कौशिक यांचा मृतदेह एअर अँब्युलन्सच्या माध्यमातून दिल्लीहून मुंबईत नेण्यात आला आहे.
सतीश कौशिक यांची मिस्टर इंडिया या चित्रपटातील भूमिका प्रचंड गाजली होती. कॅलेंडर हे त्यात त्यांनी पात्र रंगवले होते. त्यानंतरही विविध चित्रपटांत त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या. मराठीतील लालबाग परळ या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. ६६व्या वर्षी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले