सीए, सीएस नंतरही पीएचडी करता येणार

सीए, सीएस नंतरही पीएचडी करता येणार

वाणिज्य शाखेतून करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाने(युजीसी) आनंदाची बातमी दिली आहे. यापुढे सीए, सीएस हे पदव्युत्तर पदवीच्या तोडीचे मानले जाणार आहे. त्यामुळे सीए अथवा सीएस केलेल्या विद्यार्थ्यांना पीएचडी करता येणार आहे.

द इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया (आयसीएसआय) या संस्थेेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सेक्रेटरीजचा कोर्स जागतिक नियमनांना अनुसरून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. या बाबत इन्स्टिट्युटने ट्वीट करून युजीसीचे आभार मानले आहेत

आयसीएसआयचे अध्यक्ष सीएस नागेंद्र डी राव यांनी याबाबत मत व्यक्त करताना, यामुळे कंपनी सेक्रेटी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी खुल्या होतील असे म्हटले आहे.

आयसीएसआय सोबतच इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) देखील युजीसीचे आभार मानले आहेत. त्यामुळे सीए केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना जगाची दारे खुली होतील असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी ट्वीट करताना, आयसीएआयने युजीसीला सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीधारकांच्या समकक्ष मानण्याची केलेली विनंती मान्य केली आहे. यामुळे केवळ उच्च शिक्षण घेऊ शकणाऱ्या सीए विद्यार्थ्यांचाच फायदा होणार नाही तर सीए केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना जगाची दारे खुली होतील असे म्हटले आहे.

Exit mobile version