दहिसरमध्ये नागरिकांना भीती डासांच्या कारंज्याची

दहिसरमध्ये नागरिकांना भीती डासांच्या कारंज्याची

दहिसरमध्ये सध्याच्या घडीला नागरिकांची एका कारंज्याने झोप उडवली आहे. दहिसर पूर्वेकडील वामनराव सावंत रोडवरील पालिकेने बांधलेले कारंजे सद्यस्थितीमध्ये बंद आहे. दोन वर्षांपूर्वी बांधलेले हे कारंजे बंद असल्यामुळे, तेथील डबक्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. या साठलेल्या पाण्यामध्ये डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. त्यामुळे स्थानिक सध्या चिंतेत आहेत.

सध्याच्या घडीला मुंबईमध्ये एकीकडे डेंगी, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत.त्यातच पालिकेच्या या कारंज्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुख्य बाब म्हणजे, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सतत जनतेला जागृत केले जाते. पाणी साठवून ठेवून नका असे सांगितले जाते. परंतु स्वतः पालिकेने बांधलेल्या कारंज्यात साठलेले पाणी मात्र दिसत नाही हे असे विरोधाभास असलेले चित्र दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये डेंगी तसेच मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. त्यामुळे पालिकेकडून वेळोवेळी सूचना करून परिसर स्वच्छ ठेवावा असे सांगण्यात येते. परंतु पालिकेच्या या कारंज्याकडे मात्र पालिकेचेचे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात तक्रार केली असता, हे कारंजे एका उद्यानाकडे देखरेखीसाठी आहे असे थातूरमातूर उत्तर देण्यात आले. पावसाळ्याच्या शेवटच्या काळात मुंबईत मलेरिया रुग्णांची संख्या हाहा म्हणता वाढू लागते. त्यातच आता सध्याच्या घडीला मलेरिया रुग्ण हे दिवसागणिक वाढताना दिसत आहेत.

 

हे ही वाचा:

पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या

अमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी ‘नशेत’

‘जश्न-ए-रिवाज’च्या षड्यंत्राविरुद्ध तेजस्वी सूर्या मैदानात

पुँछमधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी कमांडो

 

दोन वर्षांपूर्वी पालिकेने हे कारंजे काही लाखोंचा खर्च करून बांधले होते. परंतु पालिकेकडून मात्र याची देखभाल होत नसल्यामुळे कारंजे मात्र बंद पडले आहे. त्यामुळेच त्याठिकाणी पाणी साठू लागलेले आहे. या साठलेल्या पाण्यामुळे विभागातील लोकांचे आरोग्य मात्र धोक्यात आलेले आहे.

Exit mobile version