… म्हणून राजधानीत लागणार लॉकडाऊन

… म्हणून राजधानीत लागणार लॉकडाऊन

देशाचे राजधानीचे शहर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (CPCB) ने दिल्लीतील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकारी आणि खासगी कार्यालयांना हवा प्रदूषणाला कमी करण्यासाठी वाहनांचा वापर ३० टक्क्यांनी कमी करावा असे निर्देश दिले आहेत.

शनिवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी दिल्लीच्या हवेमध्ये AQI ४९९ रेकॉर्ड करण्यात आले आहे. जी शुक्रवारपेक्षाही खराब होती. दिल्लीने यंदाची सर्वात खराब हवा काल नोंद केली. प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांवर बंदी अथवा लॉकडाऊनसारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. दिल्लीतील विषारी हवेच्या मुद्यावर दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने या सूचना केंद्र सरकारला केल्या आहेत. दिल्लीतील हवेत इतके प्रदूषण वाढले आहे की, आम्हाला आपल्याच घरात मास्क लावावा लागत आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा?

पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती

‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’

आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका

दिल्लीमध्ये जे प्रदूषण होते ते पंजाब, हरियाणासारख्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये शेतात आग लावल्याने किंवा फटाके फोडल्यामुळे होते असे नेहमी सांगितले जाते. प्रदूषणास केवळ शेतांतील धसकटांचे जळणे जबाबदार आहे, असे सिद्ध करण्याचा तुम्ही का प्रयत्न करीत आहात, प्रदूषणाच्या इतर घटकांचे काय, असे न्या. रमना यांनी विचारले.

दिल्लीत वाढलेल्या प्रदूषणामुळे तेथील शाळा व महाविद्यालये सोमवारपासून आठवडाभर बंद ठेवण्याचा, तसेच बांधकामे बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने घेतला आहे. तसेच दिल्लीचे सर्व सरकारी कर्मचारी आठवडाभर घरातून काम करणार आहेत.खासगी कार्यालयांसाठी वेगळा आदेश जारी केला जाईल. प्रदूषणासंदर्भात बोलविलेल्या तातडीच्या बैठकीत केजरीवाल यांनी हे निर्णय घेतले. तसेच दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा प्रस्ताव केजरीवाल सरकार सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे.

Exit mobile version