22 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषस्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवी शिंपलाकृती इमारत

स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवी शिंपलाकृती इमारत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

Google News Follow

Related

अंदमान निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर येथे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या दिमाखदार इमारतीचे (टर्मिनल) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय रस्ते व महामार्ग राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी पंतप्रधानांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विमानतळावरील पुतळ्याचेही अनावरण केले. मंत्र्यांनी त्याठिकाणी असलेल्या नामफलकाचे उद्घाटन केले. ही इमारत वैशिष्ट्यपूर्ण असून तिचा आकार शिंपल्यासारखा आहे. त्यामुळे या इमारतीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या बेटाचे सौंदर्यही या विमानतळामुळे वाढणार आहे.

 

ही इमारत इको फ्रेंडली असून त्यामुळे प्रदूषणाला कोणत्याही प्रकारे हातभार लागणार नाही, याची काळजी या नव्या टर्मिनलच्या उभारणीत घेण्यात आली आहे. नैसर्गिक प्रकाश व्यवस्था या इमारतीत करण्यात आली आहे. या इमारतीचे छत अशा पद्धतीने करण्यात आले आहे की, जेणेकरून सकाळच्या वेळेला त्यातून नैसर्गिक प्रकाश इमारतीत येईल त्यामुळे विजेचा वापर कमीतकमी होऊ शकेल. या नव्या इमारतीत वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता व्यवस्था करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

छोटा शकीलचे आर्थिक व्यवहार संभाळणाऱ्या आरिफ भाईजानची संपत्ती जप्त

किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार 

कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी

विरोधकांच्या बैठकीत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी

या संपूर्ण नव्या इमारतीच्या प्रकल्पासाठी ७०७.७३ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. ही इमारत ४० हजार ८३७ चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आली आहे. आता यात गर्दीच्या वेळेला १२०० प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता आहे. प्रत्येक वर्षी जवळपास ४० लाख प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकतील. नव्या आणि अत्याधुनिक सुविधांचा वापर या इमारतीसाठी करण्यात आला असून त्यात २८ चेकइ काउंटर असतील तर प्रवाशांना विमानात प्रवेश करण्यासाठी तीन पुलांचा वापर करण्यात येईल.

 

या विमानतळावर बोईंग ७६७-४०० आणि दोन एअरबस ३२१ पद्धतीची विमाने उड्डाण करू शकतील अशा प्रकारची धावपट्टी व आसपासचा परिसर तयार करण्यात आली असून त्यासाठी ८० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे दहा विमाने एकाचवेळी उभी राहू शकतात. स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळ दिल्ली, चेन्नई, हैदराबाद व विखाशापट्टणम या शहरांशी याआधीच जोडले गेले आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा