केंद्रातील मोदी सरकारने शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी महत्त्वाचा निर्णय घेत अंदमान आणि निकोबार बेटांच्या राजधानीचे नाव बदलले आहे. अंदमान- निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून ‘श्री विजयपुरम’ असे करण्यात आले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून या नामकरणामुळे बेटांच्या समृद्ध इतिहासाला अधिक उजाळा मिळेल असे बोलले जात आहे.
केंद्रात सत्तेत असलेले एनडीएचे सरकार हे मुघलांच्या, ब्रिटीशांच्या गुलामगिरीची प्रतीके असलेल्या रस्त्यांची नावे, रेल्वे स्थानकांची नावे तसेच शहरांची नावे हटवत आहेत. याचं पार्श्वभूमीवर अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. दरम्यान, शुक्रवारी मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलले आहे. पोर्ट ब्लेअरला ‘श्री विजयापुरम’ म्हणून ओळखले जाईल. १७८९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्चीबाल्ड ब्लेअरच्या सन्मानार्थ पोर्ट ब्लेअरचे नाव देण्यात आले होते.
हे ही वाचा:
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींच्या सहकाऱ्यांकडून पत्रकारावर हल्ला!
हरियाणा विधानसभा प्रचाराचे नेतृत्व पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांच्या हाती !
बिहारमध्ये बलात्कार करू पाहणाऱ्या डॉक्टरच्या गुप्तांगावर नर्सने केले वार !
मोहम्मद झाला हर्षित चौधरी, बनावट लष्करी कार्ड, २४ महिलांना फसवले, वंदे भारतमध्ये केली होती चोरी !
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. अमित शाह यांनी म्हटले आहे की, “देशाला वसाहतवादी आठवणींपासून मुक्त करण्यासाठी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून ‘श्री विजयापुरम’ करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या नावाला वसाहतवादी वारसा होता. ‘श्री विजया पुरम’ हे स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचे प्रतीक असून त्यात अंदमान आणि निकोबार बेटांची अनोखी भूमिका आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि इतिहासात अंदमान आणि निकोबार बेटांचे एक अद्वितीय स्थान आहे. एकेकाळी चोल साम्राज्याचा नौदल तळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेटाचा प्रदेश आज भारताच्या धोरणात्मक आणि विकास आकांक्षांसाठी एक महत्त्वाचा तळ बनला आहे. ही ती जागा आहे जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा आपला तिरंगा फडकावला होता. तसेच तेथील सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतंत्र राष्ट्रासाठी लढा दिला होता.”
देश को गुलामी के सभी प्रतीकों से मुक्ति दिलाने के प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के संकल्प से प्रेरित होकर आज गृह मंत्रालय ने पोर्ट ब्लेयर का नाम ‘श्री विजयपुरम’ करने का निर्णय लिया है।
‘श्री विजयपुरम’ नाम हमारे स्वाधीनता के संघर्ष और इसमें अंडमान और निकोबार के योगदान को…
— Amit Shah (@AmitShah) September 13, 2024