पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी जर्मनीहून येणार पुण्यात!

कल्याणीनगर अपघातातील गाडीची करणार पाहणी

पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी जर्मनीहून येणार पुण्यात!

पुणे अपघात प्रकरणातील पोर्शे कारच्या तपासणीसाठी कंपनीचे प्रतिनिधी जर्मनीहून पुण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.अपघातातील पोर्शे कार सध्या येरवडा पोलीस ठाण्याबाहेर झाकून ठेवण्यात आली आहे.तसेच कारच्या सभोवताली पोलिसांनी बॅरिकेट्स लावले आहेत.

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे.या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या तावडीत आहेत, त्यांची चौकशी सुरु आह.दरम्यान, अपघात झालेल्या पोर्शे कारच्या तपासणीसाठी कंपनीचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत.पोर्शे कंपनी ही मूळची जर्मनीची आहे.

हे ही वाचा:

निवडणूक निकालाच्या दिवशी पंतप्रधान मोदींची दिनचर्या कशी असते?

पंतप्रधान मोदींनी संदेशखालीच्या महिलांना केला सलाम!

केजरीवाल २ जून रोजी पुन्हा तुरुंगात; सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका!

पीएफआयचे माजी प्रमुख ई अबुबकर यांचा जामीनअर्ज फेटाळला!

मिळालेल्या माहितीनुसार, पोर्शे कारच्या तपासणीकरिता जर्मनीहून कंपनीचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत.गाडीतील इलेक्ट्रिक वस्तू आणि तांत्रिक गोष्टींच्या तपासणीसाठी कंपनीची टीम येत आहे.यापूर्वी देशातील पोर्शे कंपनीतील स्थानिक अधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी कारची तपासणी केली होती.पण आता तपासणीसाठी जर्मनीहून कंपनीचे एक ते दोन अधिकारी येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ही पोर्शे कार सध्या येरवडा पोलीस ठाण्याबाहेर असून तिला पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले आहे.सध्या राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने गाडीमध्ये पाणी जाऊन अडथळा निर्माण होऊ शकतो.त्यामुळे कारला झाकून ठेवण्यात आले आहे.तसेच पोलिसांनी कारच्या सभोवताली बॅरिकेट्स लावले आहेत.

Exit mobile version