लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरिता राजकीय पक्षाकडून जाहिरातबाजी करण्यात येत आहे.दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केलेल्या जाहिरातीमध्ये चक्क पॉर्न स्टारने काम केलं आहे, असा दावा भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.
चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांचा अपमान करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची माणसे एकही संधी सोडत नाहीत.महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी पब, पार्टी आणि पॉर्न अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार केलेला आहे.ठाकरे गटाकडून महिला अत्याचारासंदर्भात प्रसारित केलेल्या जाहिरातीत चक्क पॉर्न स्टारने भूमिका केल्याचा दावा त्यांनी केला.आदूबाळ नाईट लाइफ प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शनच्या या जाहिरात आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व मुद्दे उपस्थित केले.पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरेंच्या जाहिरातीमध्ये केलेल्या व्यक्तीचा फोटो देखील दाखवला.
त्या पुढे म्हणाल्या की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहिरातीत पॉर्न स्टारने काम केलं आहे. जाहिरातीत जे पात्र आहे ते पॉर्न स्टार आहे. विशेष म्हणजे तो व्यक्ती स्वतःच जाहिरातीमध्ये विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार, हाच पॉर्न स्टार लहान मुलींसोबत अश्लील चित्रीकरणात दिसत आहे. जाहिरातीमधील व्यक्तीच विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार, हाच पॉर्नस्टार लहान वयाच्या मुलींसोबत चित्रिकरण करतो.
हे ही वाचा:
भारताच्या पंतप्रधानपदासाठी पाकिस्तानचा पाठिंबा राहुल गांधींना
रेल्वेतील फटका गॅंगचे भयानक कृत्य; पाठलाग करणाऱ्या पोलिसाला दिले विषारी इंजेक्शन
“पाकिस्तान काँग्रेसच्या शेहजाद्याला पंतप्रधान बनवण्यास आतुर आहे”
निवडणूक आयोगाच्या एसएसटी पथकाची कारवाई, कारमधून जप्त केले ३० लाख रुपये!
बापाच्या भूमिकेत असलेली व्यक्ती , हेच पात्र उल्लू एपवर मुलींसोबत घाणेरडं कृत्य करत असल्याच्या क्लीप्स आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की महाराष्ट्रात पॉप पार्टी आणि पॉप हे ते आणतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कसली संस्कृती आणतायत. असे बाप महाराष्ट्रात, जाहिरातीत दाखवून उद्धव ठाकरेंना काय दाखवायचं आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.
जाहिरात कंपनी कोणती, कोणाची आणि त्याचा आणि पॉर्नस्टारचा काय संबंध आहे, जाहिरात कंपनीशी उद्धव ठाकरेंशी काय संबंध? जाहिरातीचा पॉप पार्टीच्या संस्कृतीचा काय संबंध आहे का याचं उत्तर जनतेला द्यायला पाहिजे.अशा माणसांबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे.केंद्र सरकारने बऱ्याच अश्लील एपवर बंदी घातली आहे आणि उरल्या सुरल्या अशा अपवर बंदी आणावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.