प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनानंतर त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत जे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते, त्याचे उत्तर मिळाले आहे.
केके यांचा लाइव्ह परफॉर्मन्स करताना हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा असल्याच्याही बातम्या पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याविषयी शंकाकुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. आता त्यांच्या शवविच्छेदन अहवालामुळे वास्तव समोर आले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, केके यांचा मृत्यू हा हृदयविकाराचा झटका आल्यानेच झाला आहे. त्यांच्या मृत्यूमागे कोणतेही संशयास्पद असे काहीही नव्हते. गेला काही काळ त्यांना हृदयविकाराचा त्रास होता, हेही स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल ७२ तासांनी उपलब्ध होणार आहे.
हे ही वाचा:
भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांत सहाव्या जागेसाठी चुरस निश्चित
‘ज्वलंत हिंदुत्वाचे प्रवक्ते औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या टिकैत यांचा निषेध करतील का?’
उघड्यावर दारू पिऊ दिली नाही म्हणून केली मारहाण, नौदलाच्या तीन सेलरना अटक
राहुल गांधींना ईडीचे पुन्हा समन्स
केके यांचा मृतदेह रवींद्र सदन येथे नेण्यात आला आणि तिथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
कोलकाता येथे नझरुल मंच याठिकाणी केके यांचा कार्यक्रम होता. तिथून हॉटेलवर परतल्यानंतर त्यांना अस्वस्था वाटू लागले म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांना अतिउत्साहामुळे हा त्रास झाल्याचेही समोर आले आहे. केके यांना हृदयाचा त्रास होतच होता पण पचनाचा त्रास आहे असे समजून त्यांनी तशी औषधे घेतली. कॉन्सर्टच्या आधीही त्यांनी पत्नीला फोन करून खांदे व हात दुखत असल्याचे कळवले होते. त्यांच्या खोलीतही पचनाची औषधे सापडली. त्यांच्या हृदयाच्या डाव्या बाजूस ८० टक्के ब्लॉकेज असल्याचेही म्हटले जाते.