रेनुकास्वामी हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शन थुगुदेपाला याला बंगळुरू पोलिसांनी मंगळवार, ११ रोजी अटक केली. या प्रकरणाशी संबंधित आणखी नऊ जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशायीतांच्या जबाबानंतर अभिनेता दर्शन याला अटक करण्यात आली आहे. दर्शन हा आरोपींच्या सतत संपर्कात होता, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
संजय राऊतांना पुळका, म्हणे नरेंद्र मोदींनी मुस्लीम मंत्री का नाही बनवला?
एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला; सीमा प्रश्नांवर तोडगा काढण्याचा निर्धार
राष्ट्रपती भवनात शपथविधीदरम्यान दिसलेला प्राणी बिबळ्या नव्हेचं!
अनिल असल्याचे भासवत खलीलचा हिंदू महिलेवर बलात्कार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
दरम्यान, मृत एस. रेणुकास्वामी चित्तदुर्गातील एका मेडिकल दुकानात काम करत होता. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. चित्रदुर्गातून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर रविवार, ९ जून रोजी त्याचा मृतदेह शहराच्या पश्चिम भागातील कामाक्षीपल्य येथे सापडला होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.