महाराष्ट्राच्या चित्ररथाला पॉप्युलर चॉईस पुरस्कार

महाराष्ट्राच्या चित्ररथाला पॉप्युलर चॉईस पुरस्कार

प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सुरुवातीला महाराष्ट्राचा चित्ररथ फेटाळला असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर केंद्र सरकारवर राजकीय वर्तुळातून टीका करण्यात आली होती. मात्र, नंतर महाराष्ट्राचा चित्ररथ समाविष्ट झालाच आणि आता त्याला बक्षीसही मिळाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर झालेल्या चित्ररथ प्रदर्शन सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला पहिले बक्षिस मिळाले आहे. तर पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत महाराष्ट्राच्या चित्ररथाची वर्णी लागली आहे.

उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला सर्वश्रेष्ठ चित्ररथाचा पुरस्कार देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशने यंदा काशी विश्वनाथाचे दर्शन देणारा चित्ररथ तयार केला होता. यापूर्वी २०२१ मध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला पहिला पुरस्कार मिळाला होता. तेव्हा राम मंदिराचा चित्ररथ साकारण्यात आला होता.

राज्यातील जैवविविधतेचं दर्शन घडवणारा चित्ररथ यंदा महाराष्ट्राने सादर केला होता. ऑनलाईन व्होटिंगमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक पसंतीची मते मिळाली. त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या निकालात महाराष्ट्राला पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत पहिले बक्षिस देण्यात आले आहे. महाराष्ट्राने ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर चित्ररथ तयार केला होता. या चित्ररथामध्ये अग्रभागी कास पठार साकारले असून त्यावर फळांचा राजा आंबा, राष्ट्रीय पक्षी मोर, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, फुलपाखरू इत्यादींच्या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा:

‘सीमा वादात अमेरिकेने भारताच्या बाजूने म्हणजे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश’

बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

आयसिसच्या म्होरक्याचा खात्मा

सर्वोच्च न्यायालय म्हणते, मनी लॉन्ड्रिंगचा वापर दहशतीसाठीही केला जातो!

संरक्षण मंत्रालयाने या पुरस्काराची घोषणा केली असून सीआयएसएफची बेस्ट मार्चिंग पथक म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय नौदलाला सर्वश्रेष्ठ मार्चिंग पथक म्हणून निवडले आहे. तर पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत हवाई दलाला पहिला क्रमांक मिळाला आहे. शिक्षण मंत्रालय आणि नागरिक उड्डान मंत्रालयाला संयुक्त विजेते म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.

Exit mobile version