मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने काल (२७ एप्रिल) ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नावाची घोषणा केली.या जागेवर भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, या जागेवर भाजपने उज्ज्वल निकम यांना संधी दिली आहे.उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता त्यांची लढत काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे.दरम्यान, भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
पूनम महाजन म्हणाल्या की, खासदारकीच्या रुपाने मला गेल्या १० वर्षात मुंबई उत्तर मध्य लोकसभेचे नेतृत्व करण्याची संधी मला दिले. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देते. मला खासदार म्हणून नाही, तर मुलीप्रमाणे स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबियांची, जनतेची नेहमी ऋणी राहिल आणि आशा करते की, आपलं नातं कायम टिकून राहिलं. माझे दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन जी यांनी मला ‘राष्ट्र प्रथम’ हा मार्ग दाखवला, तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा,अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल.जय हिंद, जय महाराष्ट्र , असे पूनम महाजन यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार
‘राजपुत्रामध्ये नवाब, निजाम, सुलतान आणि बादशाह विरोधात बोलण्याची ताकद नाही’
जेक फ्रेझर-मॅक्गर्क, स्टब्ज, रसिक चमकले; दिल्लीची मुंबईवर मात
अदानी बंदराबाबत फेक बातमी पसरवणारा ‘तो’ व्हिडीओ गुजरातचा नाही इजिप्तचा !
दरम्यान, पूनम महाजन २०१४ पासून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.यंदा त्यांना खासदारकीच्या हॅटट्रिकची संधी होती.मात्र अखेर ही संधी हुकली. पूनम महाजन यांच्या जागी भाजपने अखेर उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.त्यामुळे उज्ज्वल निकम यांची लढत काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे.