राष्ट्रीय महिला कबड्डीसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व पूजा यादवकडे

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे झालेल्या "६९व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी" कबड्डी स्पर्धेतून महाराष्ट्राचा हा संघ निवडण्यात आला आहे.

राष्ट्रीय महिला कबड्डीसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व पूजा यादवकडे

हरियाणा येथे होणाऱ्या “६९व्या महिला राष्ट्रीय” कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला आहे. मुंबई शहरच्या पूजा यादव हिच्या खांद्यावर महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. हरियाणा राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने २३ ते २६ मार्च या कालावधीत आनंद गड येथे मॅटवर ही स्पर्धा खेळविण्यात येईल.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे झालेल्या “६९व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी” कबड्डी स्पर्धेतून महाराष्ट्राचा हा संघ निवडण्यात आला आहे. निवडण्यात आलेल्या या संघात पुण्याने बाजी मारली असून त्यानंतर मुंबई शहरचा क्रमांक लागतो. निवडण्यात आलेला हा संघ प्रशिक्षिका शीतल मारणे-जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कबड्डी असो.च्या सभागृहात मॅटवर सराव करीत आहे. २२ मार्च रोजी दुपारी १२-०० वाजता वांद्रे टर्मिनस येथून हा संघ स्पर्धेकरिता रवाना होईल. राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी निवडण्यात आलेला हा संघ एका पत्रकाद्वारे माध्यमांकरिता जाहीर केला.

हे ही वाचा:

‘खलिस्तानी चळवळीला लंडनमधील शीख समुदायाने नाकारले आहे!’

फक्त नेते एकत्र येऊन भाजपाला कसे काय हरवणार… प्रशांत किशोर यांनी विचारला प्रश्न

रवींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

महाराष्ट्राच्या महिलांचा संघ असा – १) पूजा यादव (संघनायिका), २) सायली जाधव, ३)अंकिता जगताप, ४) पूजा शेलार, ५) स्नेहल शिंदे, ६) आम्रपाली गलांडे, ७) सिद्धी चाळके, ८) पूजा पाटील, ९) हरजित कौर संधू, १०) पौर्णिमा जेधे, ११) प्रतिक्षा तांडेल, १२) सायली केरीपाळे. प्रशिक्षिका :- शीतल मारणे जाधव  व्यवस्थापिका :- श्रद्धा गंभीर.

Exit mobile version