वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांचे महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी थांबवण्यात आले आहे. राज्य सरकारकडून तसे निर्देश देण्यात आले असून मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत त्यांना परत बोलावण्यात आलं आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे. खेडकर यांना २३ जुलै पूर्वी मसूरी येथील अकादमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण ३ जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण सुरू झालं होतं. मात्र, एक महिन्यानंतर त्यांची बदली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. दरम्यान, पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी गाडीवर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून २५ पानी अहवाल अप्पर सचिवांना पाठवांना पाठवण्यात आला होता पुढे त्यांची तात्काळ बदली वाशिम येथे झाली होती. वाशिममधील दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी होता मात्र आता यावर स्थगिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
वरळी हिट अँड प्रकरणी मिहीर शाहला १४ दिवसीय न्यायालयीन कोठडी!
एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार
मौलाना रझा म्हणतात, जोडप्यांना इस्लाममध्ये धर्मांतरित करणार, कारवाईची मागणी !
भाजपकडून नमो एक्स्प्रेस ट्रेन पंढरपूरला रवाना
खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचं समोर आलं. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे.