राज्यात सध्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर या चांगल्याच चर्चेत आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मनमानी कारभार करण्यावरून त्या चर्चेत आल्या तर आता त्या वाशीम येथे कार्यभार पाहत आहेत. पुण्यात स्वतंत्र केबिन, गाडीवरचा दिवा आणि स्वीय सहाय्यक अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या. तसेच आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी सादर केलेल्या ओबीसी प्रमाणपत्रांच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशातच आता पूजा यांच्या आई मनोरमा खेडकरही चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या गावातील काही शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसून येत आहे. गावातील काही शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचे काही अंगरक्षकदेखील दिसून येत आहेत. एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातला असल्याचं सांगितलं जात आहे.
व्हिडीओमध्ये इतर लोकही बोलताना दिसत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही असं करू शकत नाहीत, असं ते सांगताना ऐकू येत आहेत. त्यावर मला कायदा सांगू नका, मला माहिती आहे सगळं, सातबाऱ्यावर माझं नाव आहे, असं त्या गावकऱ्यांना सांगत आहेत.
हे ही वाचा:
नवाब मलिकांच्या जामीनात दोन आठवड्यांची मुदतवाढ
केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर पण मुक्काम तुरुंगातच!
राहुल गांधी यांचे अग्निवीरबाबतचे आरोप बिनबुडाचे असल्याचे माजी अधिकाऱ्याने केले स्पष्ट
विधान परिषदेचे मतदान सुरू; कोण मारणार बाजी?
पूजा खेडकर या २०२३ साली आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना बुलढाण्याला पहिलं ट्रेनी पोस्टिंग मिळालं. पण त्या तिथे जॉईन झाल्या नाहीत. नंतर त्यांना पुण्यात ट्रेनी पोस्टिंग मिळालं. पण तिथे जॉईन व्हायच्या आधीच त्यांनी स्वतंत्र केबिन, स्वीय सहाय्यक अशा मागण्या केल्या. पुण्यातील सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचं केबिनही त्यांनी जबरदस्तीने घेतलं. मुख्य सचिवांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण अधिक प्रकाशझोतात आले.