यूपीएससीकडून पूजा खेडकरांची उमेदवारी रद्द !

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यूपीएससीची कारवाई

यूपीएससीकडून पूजा खेडकरांची उमेदवारी रद्द !

प्रशिक्षणार्थी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला मोठा धक्का बसला आहे. यूपीएससीने पूजा खेडकरांची उमेदवारी तात्पुरती रद्द केली आहे. तसेच त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

यूपीएससीने याबाबत प्रेस नीट जारी केले आहे. यामध्ये पूजा खेडकरला २०२२ मध्ये आम्ही दिलेले पद तात्पुरते रद्द करत आहोत असे म्हटले आहे. पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केल्यानंतर आता पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरांनी यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यूपीएससीने आता पूजा खेडकर यांचे पद काढून घेतलं असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाहीत.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पूजा खेडकर यांची अनेक कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली. सुरवातीला पूजा खेडकर यांचे कारनामे समोर येता-येता त्यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांचेही अनेक कारनामे समोर आले. सध्या मनोरमा खेडकर या न्यायालयीन कोठडीत असून दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर यांचा अद्याप पत्ता नाही. पूजा खेडकर यांचे कारनामे समोर येताच यूपीएससीने २००९ ते २०२३ या दरम्यान पंधरा हजारांहून अधिक शिफारस केलेल्या उमेदवारांच्या सीएसई डेटाचा आढावा घेतला. यामध्ये पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आहे. त्यानंतर यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकर यांची उमेदवारी तात्पुरती रद्द केली आहे.

हे ही वाचा:

पी. व्ही. सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनचीही पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

‘अरविंद वैश्यच्या हत्येमागे बड्या गँगचा समावेश; उद्धव ठाकरे हे जिहाद्यांचे आका’

हत्येच्या आदल्या दिवशी दाऊद शेख यशश्रीला भेटला, तिचे फोटो अपलोड करण्याची दिली होती धमकी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूची बॅडमिंटन महिला एकेरीच्‍या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

दरम्यान, पूजा खेडकर यांनी यूपीएससीला सादर केलेल्या बनावट अपंगत्व प्रमाणपत्र प्रकरणी यूपीएससीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पूजा खेडकर यांनी पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर उद्या सुनावणी होणार असून कोर्ट काय निकाल देईल यावर सर्वांचे लक्ष्य आहे.

Exit mobile version