पूजा खेडकरला धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

अटक होण्याची शक्यता

पूजा खेडकरला धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला कोर्टाने दणका दिला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडेकरचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे.

बनावट कागदपत्रे दाखल केल्याचे समोर आल्यावर यूपीएसीने पूजा खेडकर विरुद्ध दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला होता. बनावट प्रमाणपत्राचा वापर करून आरक्षणाचा लाभ घेणे, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे, तसेच खाजगी गाडीला अंबर दिवा लावणे, असे विविध आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहेत. या प्रकरणी चौकशीसाठी पूजा खेडकर यांना हजर राहण्यासाठी पोलिसांनी तीन वेळा समन्स बजावले होते. मात्र, पूजा खेडकर या हजर राहिल्या नाहीत. या प्रकरणात अटक होईल म्हणून पूजा खेडकर यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोर्टाने त्यांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पूजा खेडकरला आता कधीही अटक होऊ शकते.

हे ही वाचा:

श्री कृष्ण जन्मभूमी: मुस्लीम पक्षाला दणका, हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार

बालविवाह प्रतिबंधक कायदा सर्वधर्मीयांसाठी सारखाच

माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला

हमासच्या प्रमुखानंतर लष्कर प्रमुखालाही केले ठार !

दरम्यान, यूपीएससीने काल (३१ जुलै) पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करत त्यांची उमेदवारी तात्पुरती रद्द केली आहे. तसेच त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर यूपीएससीने ही कारवाई केली.

Exit mobile version