अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरचे बनावट रेशन कार्ड?

पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरचे बनावट रेशन कार्ड?

प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. अपंगत्व प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर घर नसून कंपनी असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्नालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन अपंगत्वाच प्रमाणपत्र मिळविल्याचे समोर आले आहे.

अपंगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पूजा खेडकर यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरिअल (वायसीएम) हॉस्पिटलमध्ये दिलेल्या पत्त्यावर कोणी राहत नसल्याचे समोर आले आहे. ‘प्लॉट नंबर ५३, देहू-आळंदी, तळवडे’ असा निवास्थानाचा पत्ता पूजा खेडकर यांनी दिला होता. मात्र, हा पत्ता बंद पडलेल्या ‘थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा असल्याचे उघड झाले आहे. ही कंपनी सध्या बंद अवस्थेत असून या ठिकाणी कोणीही राहत नसल्याची माहिती आहे. या कंपनीच्या पत्त्याचा वापर करून बनावट रेशनकार्ड तयार करून पूजा खेडकर यांनी अपंगत्व प्रमाणपत्र मिळविल्याचे बोलले जात आहे. तसेच जप्त करण्यात आलेली ऑडी कारवर देखील याच पत्त्याची नोंद होती.

हे ही वाचा:

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेच्या ठिकाणाहून AK-47 रायफल बाळगणाऱ्याला अटक

ओमानच्या किनारपट्टीलगत तेलाचा टँकर उलटून १३ भारतीयांसह १६ जणांचा क्रू बेपत्ता

चंद्रभागेच्या तिरी, दुमदुमली पंढरी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ माउलींच्या चरणी

दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पूजा खेडकर यांचे कुटुंबीय अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच मुळशी तालुक्याचे तहसीलदार पूजा खेडकर यांच्या वडिलांना दिलीप खेडकर यांना नोटीस बजावणार असल्याची माहिती आहे. दिलीप खेडकर यांच्याकडे बेकादेशीर माती उत्खननाच्या ६७ लाखांची थकबाकी असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version