३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कोल्हापूरच्या पूजा दानोळेने आणखी एक पदकांची कमाई करीत रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला महिला गटाचे विजेतेपद जिंकून दिले. पूजाने शुक्रवारी साठ किलोमीटरच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले.
आपली पदकांची मालिका कायम राखत सायकलिंग मधील वैयक्तिक टाईम ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या पूजा हिने आज ६० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिची या कामगिरीने महाराष्ट्राने रोड सायकलिंगचे विजेतेपदावर नाव कोरले.
हे ही वाचा:
‘आप’ भ्रष्टाचारी है… म्हणत आम आदमीच्या आमदाराचा राजीनामा
मुंडे-अजितदादा दोघेही आरसा साफ करतायत…
देशाची अर्थव्यवस्था ६.३ ते ६.८ टक्के दराने वाढणार
ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवले
डोंगरदर्यातील रुद्रपूरमधील शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या शर्यतीत पूजा हिने हे अंतर एक तास ४५ मिनिटे १०.५९० सेकंदात पार केले. सुवर्णपदक जिंकणार्या गुजरातच्या मुस्कान गुप्ता हिला हे अंतर पार करण्यास एक तास ४५ मिनिटे १०.५१२ सेकंद वेळ लागला. स्पर्धेत १ सुवर्ण, १ रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राने रोड सायकलिंगमधील महिला गटाचे विजेतेपदावर नाव कोरले. ही दोन्ही पदके पूजा दानोळेने जिंकून महाराष्ट्राची शान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उंचविली आहे.
पूजा हिचे वडील बबन व भाऊ हर्षद हे दोघेही नामवंत कुस्तीगीर आहेत. पूजा हिला सुरुवातीला दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून सध्या ती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सायकलींग अकादमीत अनिल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.