कोरोना काळात मालिकांचे शूटींग हे बंद पडल्यामुळे, टीव्ही चॅनल्सना नुकसान सहन करावे लागले होते. या कोरोनामुळे शुटींग निर्बंध आल्यामुळे निर्मातेसुद्धा चांगलेच हवालदिल झाले होते. परंतु नंतर मात्र यथासांग गोष्टी नीट ट्रॅकवर येऊ लागल्या. घरामध्ये ठराविक एक मालिकांची मेजवानी पुन्हा एकदा सुरू झाली. दुसरी लाट आली असता, महाराष्ट्रात निर्बंध म्हणून सर्वच मालिकांनी आपली महाराष्ट्राची हद्द ओलांडली. महाराष्ट्राबाहेर जाऊन मालिका कलाकारांनी तसेच निर्मात्यांनी आपले काम सुरू ठेवले.
कोरोना निर्बंधांनंतर छोटा पडद्याचा चेहरा पूर्णपणे बदललेला आहे. टाळेबंदीनंतर ही एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. छोटा पडदा हा एक हक्काचा प्रेक्षकवर्ग जमवणारा आहे. त्यामुळेच छोट्या पडदा हा कुटूंबातील एक महत्त्वाचा घटक आहे.
टाळेबंदीनंतर मालिकांवरील निर्बंध उठले. त्यानंतर निर्मात्यांनी तसेच चॅनल्सनी सुद्धा नवीन विषयांसाठी कंबर कसली. यामुळेच मालिकांकडे हिंदी तसेच अनेक मोठे कलाकार वळू लागले. यामुळेच मालिकांचे आर्थिक गणितही बदलले आहे. मालिकांचा चेहरामोहरा बदलला, विषयांमधील नाविन्य तसेच नावाजलेले कलाकार मालिकांकडे वळू लागले आहेत. या सर्व कारणांमुळे अर्थकारणही बदलले आहे. त्यामुळेच आता कलाकारांचा भाव वधारू लागलेला आहे. प्रतीदिन ८० हजार ते १ लाख ६० हजार मानधन लोकप्रिय कलाकारांना या घडीला मिळत आहे. त्यामुळेच या माध्यमाची व्याप्ती आणि याची महती आपल्याला लक्षात येईल.
हे ही वाचा:
गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या
ट्रिपल सीट दुचाकीस्वारांची गर्दी वाढली
समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं
पंजशीरवर कब्जाचा तालिबानकडून दावा
सध्या कोरोना निर्बंधांमुळे नाटकांची तिसरी घंटा काही काळ बंदच आहे. त्यामुळेच सध्या मालिकांकडे वळणारे कलाकार दिसत आहे. लोकप्रिय कलाकारांच्या साथीने चॅनल्स आता नवीन मालिका घेऊन येताहेत. सध्याच्या घडीला अनेक नवीन येऊ घातलेल्या मालिका आपले लक्ष वेधून घेत आहेत. नवीन मालिकांची ही सुरूवात म्हणजे अर्थकारण बदलल्याची चिन्हे आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये.