दिल्लीत प्रदूषण वाढले; पाचवी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन भरणार

ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा (GRAP) तिसरा टप्पा लागू करण्याचा निर्णय

दिल्लीत प्रदूषण वाढले; पाचवी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन भरणार

दिल्लीसह आजूबाजूच्या राज्यांत धुक्यासह प्रदूषणाची पातळी वाढत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची परिस्थिती असून आरोग्याच्या तक्रारीही उद्भवल्या आहेत. प्रदूषण कमी व्हावे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून अनेक पावले उचलली जात आहेत. हवेची सतत खालावत चाललेली गुणवत्ता पाहता, कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने (CAQM) शुक्रवार, १५ नोव्हेंबरपासून दिल्ली- NCR मध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा (GRAP) तिसरा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेता, दिल्ली सरकारने शाळांना पाचवीपर्यंतच्या मुलांना ऑनलाइन वर्ग घेण्यास सांगितले आहे. दिल्लीमध्ये GRAP चा तिसरा टप्पा लागू झाल्यानंतर अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात येणार आहे.

दिल्ली- एनसीआरमधील वायू प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी GRAP तयार करण्यात आला आहे. सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये GRAP चा तिसरा टप्पा लागू करण्यात आला असून याचा उद्देश प्रदूषणाची पातळी कमी करणे हा असणार आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होताच अनेक प्रकारच्या उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. GRAP चा तिसरा टप्पा लागू झाल्यानंतर, दिल्ली- NCR मध्ये कोणत्याही प्रकारच्या बांधकामावर बंदी असणार आहे. त्याच वेळी, तोडफोड आणि सार्वजनिक क्रियाकलापांवर बंदी आहे. याशिवाय रंगकाम, वेल्डिंग, गॅस कटिंग आदी कामांवर बंदी असेल. या काळात डेब्रिज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासही बंदी असेल. सिमेंट, प्लास्टर, कोटिंगची कामेही पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आली आहेत. या काळात रस्तेबांधणी व इतर दुरुस्तीची कामेही बंद राहतील. इतर राज्यांतून येणाऱ्या डिझेल वाहनांवर बंदी असणार आहे.

हे ही वाचा:

हिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटातून माघार घेणारे तनवाणी शिंदे गटात 

मालेगावात १२५ कोटींचे इंधन आले कुठून?

भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!

मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या राजस्थानमधील उमेदवाराला अटक

शुक्रवारी, दिल्लीच्या विविध भागात AQI ४०० च्या वर नोंदवला गेला आहे. अलीपूरमध्ये ४७४, अशोक विहारमध्ये ४७८, चांदनी चौकात ४१६, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिलशाद गार्डनमध्ये ४०७, नेहरू नगरमध्ये ४८०, दिल्ली विद्यापीठ उत्तर कॅम्पसमध्ये ४४८, द्वारकामध्ये ४४४, रोहिणीमध्ये ४५८ नोंदवले गेले आहे.

Exit mobile version