दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी ९९९ वर

व्हिजीबीलीटी देखील घटली

दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी ९९९ वर

Commuters are seen amid heavy smog in New Delhi on November 8, 2018. - Air pollution in New Delhi hit hazardous levels on November 8 after a night of free-for-all Diwali fireworks, despite Supreme Court efforts to curb partying that fuels the Indian capital's toxic smog problem. (Photo by Money SHARMA / AFP)

राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा वाढली आहे. दिल्लीतील आनंद विहार, जहांगीरपुरी, आरके पुरम, ओखला, श्रीनिवासपुरी, वजीरपूर, बवाना आणि रोहिणी येथेही प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दिल्लीतील व्हिजीबीलीटी देखील घटल्याचे पाहायला मिळाले होते. काही परिसरांमध्ये १०० मीटर अंतरावरही स्पष्ट दिसणे अवघड झाले आहे. दिवाळीपूर्वीच दिल्ली-एनसीआरची एक्यूआय पातळी वाढली होती, पण त्यानंतर झालेल्या पावसाने थोडासा दिलासा दिल्लीवासियांना मिळाला होता.

दिवाळीपूर्वीच प्रदूषणामुळे बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाके आणि फटाक्यांची विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत दिल्ली-एनसीआरच्या जनतेने फटाके फोडले. त्यामुळे काही अंशी घसरलेली पातळी लगेचच वाढली.

हे ही वाचा.. 

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!

आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!

मथुरात फटाका मार्केट पेटले, नऊ जण जखमी!

दिल्ली-एनसीआर मध्ये यावर्षी दिवाळीनंतर झालेल्या प्रदूषणाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. यापूर्वी २०१६ मध्ये एक्यूआय ४३१ नोंदवला गेला होता. यानंतर २०२० मध्ये ४४१ तर २०२१ मध्ये ३८२, २०१९ मध्ये ३३७, २०२१ मध्ये ३१९ आणि २०१८ मध्ये २८१ नोंदवला गेला होता. माहितीनुसार, ० ते ५० च्या दरम्यान एक्यूआय चांगला मानला जातो, ५१ ते १०० मध्ये समाधानकारक, १०१ ते २०० च्या मध्ये मध्यम, २०१ ते ३०० खराब तर ३०१ ते ४०० च्या मध्ये असलेला एक्यूआय खराब मानला जातो. ४०१ ते ५०० एक्यूआय गंभीर मानला जातो.

Exit mobile version