28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषकेंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो, मतदानाच्या आकडेवारीत फेरफार अशक्य!

केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो, मतदानाच्या आकडेवारीत फेरफार अशक्य!

पाच टप्प्यांतील मतदानाची व मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी जाहीर

Google News Follow

Related

भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी पहिल्या पाच टप्प्यांतील मतदानाची व मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी जाहीर केली. तसेच, मतांच्या आकडेवारीमध्ये कोणतीही फेरफार अशक्य असल्याची ग्वाही आयोगाने दिली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी ४८ तासांमध्ये प्रसिद्ध करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली होती.

निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने न्यायालय हस्तक्षेप करून आयोगाला कोणताही आदेश देणार नाही, असे स्पष्ट केले होते. शिवाय, मतदानाची आकडेवारी तातडीने देण्यासाठी आयोगाला अधिक मनुष्यबळ लागेल, असे निरीक्षणही नोंदवले होते. मात्र न्यायालयाच्या सुनावणीनंतर दुसऱ्याच दिवशी, शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यांतील प्रत्येक मतदारसंघात मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर अंतिम मतदान जाहीर करण्यात विलंब आणि निवडणूक मंडळाने जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत कथित तफावत यावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर हे समोर आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयोगाला मोठा आधार मिळाला असून लोकशाहीच्या बळकटीसाठी आयोगालाही मोठी जबाबदारी सांभाळावी लागेल.

हे ही वाचा:

राजकोट दुर्घटनेप्रकरणी गेम झोन मालकासह तिघांना अटक!

खानदानी मस्तवालपणा उतरवला!

‘१५ कोटी पार…’ वाले मतदार कोणाच्या बाजूला???

महिलेला मोटारीची धडक, सायन रुग्णालयातील डॉ. राजेश डेरे यांच्याविरुद्ध गुन्हा

त्यामुळे आयोगाने प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची पूर्ण संख्या जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सहभागात्मक आहे. मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात विलंब झालेला नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोग आणि त्यांचे अधिकारी राज्यभरातील वैधानिक बाबी लक्षात घेऊन, शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने मतदानाची माहिती प्रसिद्ध करत आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

अंतिम मतदार यादी: मतदार यादी अंतिम झाल्यानंतर ती उमेदवारांना प्रदान केली जाते.
फॉर्म १७ सी: प्रत्येक मतदान केंद्रासाठी अधिकृत एजंटना म्हणजेच सर्व उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना हा अर्ज प्राप्त होतो, ज्यामुळे पारदर्शकता सुनिश्चित होते. मतदानाया दिवशीच मतांची माहिती दिली गेल्याने ती कोणीही बदलू शकत नाही.

फेरफार अशक्य: फॉर्म १७सी मध्ये नोंदवलेली मते बदलली जाऊ शकत नाहीत.
सुरक्षित वाहतूक: ईव्हीएम आणि वैधानिक कागदपत्रांसह, फॉर्म 17सी सह, स्टोरेज सुरक्षित करण्यासाठी सुरक्षित वाहतूक केली जाते. पडताळणी: उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रांवर फॉर्म १७ सी डेटाची पडताळणी करतात.
मतदारांच्या मतदानाची माहिती : प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून मतदार मतदान ॲपवर मतदार मतदानाचा डेटा नेहमी २४ x७ तास उपलब्ध होता, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा