छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली न्हवती तर केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, आक्रमण केलं होतं, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या या वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी-विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. याच दरम्यान, सुरत लुटीवरून पंतप्रधान मोदींचे १० वर्षांपूर्वीचे भाषण व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात महाराजांनी सुरत लुटली नसल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींचे व्हायरल झालेले भाषण १० वर्षांपूर्वीचे आहे. संभाजी भिडे यांनी आयोजित केलेल्या धारातीर्थ यात्रेच्या निमित्ताने ५ जानेवारी २०१४ रोजी नरेंद्र मोदी रायगड किल्ल्यावर आले होते. त्यावेळीचे हे भाषण आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, उद्या ६ जानेवारी आहे, मी रस्त्यावरून येत असताना एका वृत्तपत्राच्या आर्टिकलवर माजी नजर गेली. ३५० वर्षांपूर्वी ६ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज सुरतला आले होते. पण इतिहासकारांनी सुरत लुटली असे सांगत महाराजांचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराज सुरतला या साठी आले होते, कारण त्यांना माहिती मिळाली की, औरंगजेब आपला संपूर्ण खजिना सुरतमध्ये जमा करत आहे आणि शाहिस्तेखान त्याचे संरक्षण करत होता.
हे ही वाचा :
अरबी समुद्रात रेस्क्यू करायला गेलेल्या हेलीकॉप्टरला अपघात; तीन जण बेपत्ता
हिंदू विद्यार्थ्यांच्या कपाळावरील तिलक काढण्याचे प्रकरण : दोन शिक्षिका निलंबित
आपचे आमदार अमानतुल्ला खानला चार दिवसांच्या ईडी कोठडीत!
गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक
ते पुढे म्हणाले, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी लुटारूंनी लुटलेले जे धन आहे त्याचाच वापर करावा, असा विचार महाराजांनी केला होता. स्थानिक लोकांचा सहयोग आणि समर्थन नसते तर हे शक्य न्हवते. मी इतिहासकार नसलो तरी अनुमान लावू शकतो. सुरतच्या त्या काळातील काही लोक असतील ज्यांनी महाराजांना माहिती दिली असेल, रस्ते दाखवले असतील, महाराजांच्या सैन्यांची लपण्याची, जेवणाची सोय केली असेल. त्यावेळी संपूर्ण प्रकारचे पाठबळ सुरतच्या नागरिकांनी महाराजांना दिले असेल, त्यामुळे तेव्हा महाराजांनी औरंगजेबाच्या खजिन्यावर कब्जा मिळविला असेल. त्यामुळे ‘सुरत लुटली’ असा शब्दप्रयोग करणे हा महाराजांचा घोर अपमान आहे. ही विकृत इतिहासकारांची देण आहे. या अशा शब्दांमुळेच ज्या इतिहासाचा स्वाभिमान आणि गौरव व्हायला हवा त्याबद्दल काही ना काही शंका उपस्थित केली जाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.