शेतकऱ्यांकडून राजकीय विधाने योग्य नाहीत

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर

शेतकऱ्यांकडून राजकीय विधाने योग्य नाहीत

आंदोलकांना हरियाणामध्ये प्रवेश करू न देण्यासाठी हरियाणा पोलिसांनी आपल्या सीमेवर पहारा देत पंजाबमध्ये तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, शेतकरी राजकीय वक्तव्ये करत आहेत. दिल्लीत जाण्याचा प्रत्येकाला लोकशाही अधिकार आहे पण शेतकऱ्यांची पद्धत योग्य नाही ती संशयास्पद वाटते असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री खट्टर म्हणाले. दिल्ली सीमेवर आंदोलकांनी कशी नाकेबंदी केली आणि वर्षभर चाललेल्या या आंदोलनामुळे लोकांची कशी गैरसोय झाली, हे आपण यापूर्वी पाहिले आहे. असे वातावरण निर्माण करणे योग्य नाही. ट्रॅक्टर हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन नाही. ते ट्रेन, बस करून दिल्लीला जाऊ शकतात. ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी असतो. आहे. शेतकऱ्यांनी सरकारबरोबर बसून चर्चा केली पाहिजे.

सिगारेट न दिल्याने तरुणाचा खून, तीन आरोपी ताब्यात!

येरवाडा कारागृहात आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण

“अरब देश पाकिस्तानऐवजी भारताची निवड करतायत”

बबन घोलप यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र!

यानंतर शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यात डल्लेवाल असे म्हणाले आहेत कि राम मंदिरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा अधिक सुधारली आहे. हा त्यांचा वाढलेला आलेख खाली आणावा लागेल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागार कांचन गुप्ता यांनी डल्लेवाल यांचा हा व्हिडिओ शेअर केला असून याला त्यांनी या तथाकथित शेतकरी आंदोलनामागील खरा अजेंडा हा असल्याचे म्हटले आहे. खट्टर यांनी डल्लेवाल यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, हे सरळ सरळ राजकीय विधान आहे. अशा पद्धतीच्या आंदोलनाला जनता साथ देणार नाही. आंदोलनामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये कोणतीही बाधा येणार नाही, असेही ते म्हणाले.

 

Exit mobile version