कर्नाटक: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत १७ पैकी ११ उमेदवार मंत्र्यांचे नातेवाईक!

काँग्रेसची पुन्हा घराणेशाही सुरु, भाजपची टीका

कर्नाटक: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत १७ पैकी ११ उमेदवार मंत्र्यांचे नातेवाईक!

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसायाला सुरवात केली आहे.दरम्यान, काँग्रेसने कर्नाटकमध्ये गुरुवारी(२१ मार्च) आपल्या १७ उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, या नावांनी पक्षात खळबळ उडाली आहे.कर्नाटकात दोन टप्प्यात मतदान होणार आहे.काँग्रेसकडून कर्नाटकमध्ये आतापर्यंत एकूण २४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

काँग्रेसने ८ मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली होती, त्यात सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती.पहिल्या यादीत एकाही मंत्र्याचे किंवा आमदाराचे नाव नव्हते. मात्र, पक्षाची दुसरी यादीही समोर आल्याने वादाला तोंड फुटले आहे.दरम्यान, कोलार, चित्रदुर्ग, चिकबल्लापूर, चामराजनगर आणि बेल्लारी या जागांसाठी पक्षाने अद्याप उमेदवारांची नावे निश्चित केली नाहीत.

हे ही वाचा:

ऐतिहासिक यश; इस्रोच्या ‘पुष्पक’ची यशस्वी चाचणी!

‘आप’च्या समोर नेतृत्वाचे संकट

‘जावेदने साजिदला माझ्या घरी आणले; त्याची आमच्यासमोर चौकशी करा’

कोइम्बतूरमधून अण्णामलाई यांना उमेदवारी देण्यामागे भाजपचा उद्देश काय?

काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या १७ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील पाच कॅबिनेट मंत्र्यांच्या मुलांची नावे आहेत.तिकिटांचे असे वाटप पाहून पक्षातील सदस्यांमध्ये वाद सुरू झाला आहे.कर्नाटकमध्ये भाजप-जेडीएस युतीचा सामना करण्यासाठी काँग्रेसने मंत्र्यांच्या कुटुंबीयांना बहुतांश तिकिटे वाटप केली आहेत.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीवरून भाजपने टीका केली आहे.तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी काँग्रेस घराणेशाहीला प्रोत्साहन देत आहे, अशी टीका भाजपनेते बसनगौडा पाटील यत्नल यांनी केली.

Exit mobile version