निवडणूक चिन्ह राजकीय पक्षांची मालमत्ता नाही

न्यायालयाने खडे बोल सुनावले

निवडणूक चिन्ह राजकीय पक्षांची मालमत्ता नाही

राजकीय पक्ष निवडणूक चिन्ह त्यांची मालमत्ता म्हणून घोषित करू शकत नाहीत आणि खराब कामगिरीसाठी चिन्ह काढूनही घेऊ शकत नाही असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला ‘ज्वलंत मशाल’ निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. त्या विरोधातील याचिका फेटाळणाऱ्या एकल न्यायाधीशाच्या आदेशाला आव्हान देणारे समता पक्षाचे अपील फेटाळताना उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे .

ज्वलंत मशाल हे आपले निवडणूक चिन्ह असून या चिन्हावर आपण निवडणूक लढविल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचा संदर्भ दिला आणि म्हटले की निवडणूक चिन्ह ही वस्तू नाही आणि त्यातून उत्पन्नही मिळत नाही.

हे ही वाचा : 

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

“कोट्यवधी निरक्षर मतदारांना त्यांच्या मताधिकाराचा योग्य वापर करता यावा यासाठी विशिष्ट राजकीय पक्षाला केवळ चिन्ह जोडलेले असते. समता पक्षाच्या सदस्यांना ज्वलंत मशाल चिन्ह वापरण्याची परवानगी असतानाही, २००४ मध्ये पक्षाची मान्यता रद्द झाल्यापासून, हे चिन्ह स्वतंत्र चिन्ह बनले आहे आणि ते इतर कोणत्याही चिन्हाने बदलले जाऊ शकत नाही. ते निवडणुकीच्या अधिकारक्षेत्रात आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Exit mobile version